दाक्षिणात्य कलाविश्वात नावलौकिक मिळवल्यानंतर हिंदी सिनेविश्व आणि त्यानंतर ओटीटी क्षेत्रातही लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या अभिनेत्री तमन्ना भाटियानं आपला वेगळा चाहकतावर्ग निर्माण केला आहे. याच तमन्नानं तिच्या जीवनातील अनेक गोष्टी कायमच काही मुलाखतींमधून सर्वांसमोर आणल्या. अनेकदा ती खासगी जीवनाविषयीसुद्धा तितक्याच स्पष्टपणे बोलली आणि यावेळीसुद्धा एक मुलाखत (Interview)इथं अपवाद ठरली नाही. फक्त मुद्दे जरा जास्त चर्चेत राहणारे होते इतकंच…

कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात तमन्नाचं नाव भारतीय संघातील खेळाडू विराट कोहलीशीसुद्धा जोडलं गेलं होतं. याचसंदर्भात भाष्य करताना तमन्नानं काही गोष्टी स्पष्ट करत सगळंच सांगितलं(Interview). आपल्याला या चर्चा ऐकल्यानंतर अतिशय वाईट वाटतं असंही ती म्हणाली. ‘मला फार वाईट वाटतं हे ऐकून. कारण मी त्याला (विराटला) फक्त एकदा, दोनदाच भेटले होते. चित्रीकरणानंतर मी विराटला कधीच भेटले नाही, त्याच्याशी बोलले नाही.
किंबहुना मी त्याला आताही कधी भेटत नाही’ असं ती म्हणाली.2010 मध्ये एका जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान तमन्ना आणि विराटची भेट झाली होती. ज्यानंतर ते एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आपण फक्त कामाच्याच मुद्द्यांवर बोललो, त्याहून कमी-जास्त काहीच नाही असंच तमन्नानं नुकत्याच ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केलं.
सोशल मीडिया आणि इंटरनेटवर सेलिब्रिटी मंडळींविषयी कैक चर्चांना उधाण येतं. त्यातलीच एक प्रचंड गाजलेली आणि अनेकांच्याच भुवया उंचावून गेलेली चर्चा म्हणजे तमन्ना आणि पाकिस्तानच्या क्रिकेट संघातील माजी खेळाडू अब्दुल रझाक यांच्या लग्नाची. याचविषयी म्हणताना तमन्ना म्हणाली, ‘मजाक मजाक मे अब्दुल रझाक…. इंटरनेट ही एक कमाल जागा असून, इंटरनेटनुसार माझं आणि अब्दुल लझाक यांचं लग्न झालंय…’ या मिश्किल आणि प्रचंड चर्चांना वाव देणाऱ्या वक्तव्यावर तिनं स्वत:च खिल्ली उडवल्याचं पाहायला मिळालं.
मुलाखतीदरम्यान तमन्नानं कैक मुद्द्यांवरील प्रश्नांची उत्तरं देत करिअर, खासगी जीवनाभोवतीसुद्धा वळसा मारल्याचं पाहायला मिळालं. तिची हीच मुलाखत सध्या कलाजगत आणि सोशल मीडियावर रिल्स, शॉर्ट्स आणि वृत्तांच्या माध्यमातून चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे.
हेही वाचा :
“इंजेक्शन घेतलंस का रे तू?” शुभमन गिल आणि आकाश दीप यांच्यातील संवाद स्टंप माइकमध्ये कैद
या शेतकऱ्यांना २००० नव्हे तर ७००० मिळाले; तुम्हाला आले का? वाचा सविस्तर
संतापजनक! शाळेत जात असतांना बळजबरीने गाडीत बसवलं, विनयभंग केला, पाईपने मारहाण केली