24 भारतीय असलेल्या जहाजावर हल्ला, भारताचा संताप, थेट इराणला

होर्मुज खाडीत 24 भारतीय नागरिक असलेल्या जहाजावर मोठा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर एकच मोठी खळबळ उडाली. त्यातच आता भारताने आपला निषेध व्यक्त केला. जहाजावर वारंवार हल्ले होत असल्याचे त्यांनी म्हटले.

होर्मुज खाडीत तणाव पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यातच ओमानच्या किनारपट्टी भागात आणि होर्मुज खाडीत पनामाच्या ध्वज असलेल्या जहाजावर क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला. या जहाजावर तब्बल 24 भारतीय खलाशी होते. यात एकून 25 खलाशी होते, त्यापैकी 24 भारतीय होते. हे जहाज एलपीजी गॅस वाहून नेत होते. (ship) अचानक क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आल्याने मोठी आग लागली. भारतीय खलाशी सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे. भारत सरकार अॅक्शन मोडवर असून भारताने या हल्ल्याचा निषेध करत खडेबोल सुनावले आहेत. या जहाजावरील 24 भारतीय खलाशी सुरक्षित असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. हेच नाही तर या खलाशांच्या सुरक्षेसाठी परराष्ट्र मंत्रालय ओमानमधील भारतीय दूतावाच्या संपर्कात देखील आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्सवर एक प्रसिद्धीपत्रक शेअर केले. त्यावर सर्व माहिती देण्यात आली. 16 नोव्हेंबर 2026 रोजी स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये पनामाचा ध्वज असलेल्या एमटी तारा गॅस या एलपीजी टँकर जहाजावर झालेल्या हल्ल्याचा परराष्ट्र मंत्रालयाने निषेध केला आहे. 24 भारतीय नागरिकांपैकी 21 जणांना सुरक्षित काढण्या आले. या हल्ल्यात दोन भारतीय नागरिक जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर एक भारतीय नागरिक बेपत्ता आहे. (ship) ज्याचा शोध हा घेतला जात आहे. या कर्मचाऱ्यांना शोधण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. ओमानच्या अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून काम सुरू आहे. आम्ही या बचावकार्यावर बारीक नजर ठेऊन आहोत.

या काळात ओमान सरकारकडून मदत केली जात असून त्यांचे आम्ही आभार मानतो. जहाजावरील हल्ला हा अत्यंत गंभीर आहे. सतत हल्ले केले जात आहेत. खलाशांच्या सुरक्षेच्या प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. व्यापारी जहाजांना आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे थांबले पाहिजे, असे भारताने थेट म्हटले. (ship) त्यापूर्वी भारताचे बंदरे जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत 16 नोव्हेंबर रोजी होर्मुज खाडीत जहाजावर झालेल्या हल्ल्याची माहिती देत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. पनामाचा ध्वज असलेल्या तारा गॅस या एलपीजी टँकरवर क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली होती.

हेही वाचा : 

अल्पवयीन मुलींना रात्री रस्त्यावर उतरवणे एसटी कर्मचाऱ्यांना भोवले बस चालक अन् कंडक्टर निलंबित

लाडकी बहीण योजनेचे ₹3,000 एकत्र मिळणार ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

कुरुंदवाड न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू