काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल

बिहारच्या जमुई जिल्ह्यातील काकी-पुतण्याच्या व्हायरल लव्ह स्टोरीने(district)सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या नात्याबाबत इंटरनेटवर तुफान चर्चा रंगली आहे. तसेच नेटकऱ्यांनी व्हायरल व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहे. याचदरम्यान, दोघांच्या लव्ह स्टोरीबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे. काकी आयुषीचा पती विशाल आणि पुतण्या सचिनच्या आई-वडिलांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती की, आयुषी पळून गेल्यानंतर विशालने गावात चहाची टपरी सुरु केली. त्यातून मिळणाऱ्या पैशात तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे.

पण याचदरम्यान, सचिन आणि आयुषी हैदराबादमध्ये मौजमजा करत रील बनवत असल्याचं समोर आलंय. दरम्यान, काकी-पुतण्याचे ३ नवे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
पटनाच्या आयुषीचं लग्न विशाल कुमारसोबत २०२१ मध्ये झालं होतं. सुरुवातीला सर्वकाही ठीक होतं. पण विशालचा पुतण्या सचिनसोबत आयुषीची जवळीक वाढली.(district) दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. विशालला पत्नीच्या अफेअरबाबत कळलं, तेव्हा वादविवाद सुरु झाले. पण आयुषीनं सचिनसोबत जीवन जगण्याचा निर्णय घेतला. हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं आणि विशालने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. त्यानंतर आयुषी आणि सचिन पाच दिवसांसाठी गायब झाले. गावात परतल्यानंतर त्यांनी विशालसमोरच लग्न केलं.

लग्नानंतर आयुषीने माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की, ‘ती आता तिचं आयुष्य सचिनसोबत जगेल. सचिनच्या प्रेमात पडलेल्या आयुषीने मुलालाही सोडलं होतं. त्यांची ही लव्ह स्टोरी वाऱ्यासारखी पसरली.(district)काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. पण आता त्यांचे नवे तीन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये ते रील बनवताना दिसत आहेत.

हेही वाचा :

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मोदी सरकार 4% महागाई भत्ता वाढवणार

भारतीय महिला संघ तिसऱ्या T20 सामन्यात कोसळला! इंग्लडने 5 धावांनी मिळवला विजय

Khloe Kardashian ने केली Rhinoplasty शस्त्रक्रिया! जाणून घ्या राइनोप्लास्टी केल्यामुळे त्वचेला होणारे फायदे