पोस्ट, कमेंट, लाईकवर बंदी? 16 वर्षांखालील मुलांसाठी सरकारचा मोठा प्लॅन?

सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे मुलांच्या मानसिक आरोग्य, गोपनीयता आणि ऑनलाइन सुरक्षिततेबाबत जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे.(children) याच पार्श्वभूमीवर व्हिएतनाम सरकार 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर कठोर निर्बंध आणण्याच्या तयारीत आहे. या नव्या नियमांमुळे अल्पवयीन मुलांना सोशल मीडियावर पोस्ट करणे, लाईक करणे, कमेंट करणे किंवा इतर प्रकारच्या सार्वजनिक सहभागावर मर्यादा येण्याची शक्यता आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, व्हिएतनाम सरकारने यासंदर्भातील मसुदा तयार केला असून तो लवकरच लागू केला जाऊ शकतो. प्रस्तावित नियमांनुसार 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया अकाउंट तयार करण्यासाठी पालक किंवा कायदेशीर पालकांची माहिती आणि संमती आवश्यक असेल. (children) त्यामुळे मुलांच्या ऑनलाइन हालचालींवर पालकांचे अधिक नियंत्रण राहणार आहे.

या नियमांमध्ये पालकांवरही महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. मुलं कोणता कंटेंट पाहतात, सोशल मीडियावर किती वेळ घालवतात आणि त्यांची ऑनलाइन सुरक्षितता यावर लक्ष ठेवणे पालकांसाठी आवश्यक राहणार आहे.सोशल मीडिया कंपन्यांनाही या नव्या धोरणांतर्गत अधिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. वापरकर्त्यांचे वय ओळखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, वयानुसार योग्य कंटेंट दाखवणे आणि मुलांच्या खात्यांसाठी अधिक मजबूत गोपनीयता व सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देणे कंपन्यांसाठी बंधनकारक करण्यात येणार आहे.

याशिवाय हिंसा, अश्लीलता, जुगार, आत्महत्येशी संबंधित किंवा मुलांसाठी हानिकारक (children) ठरू शकणारा कंटेंट ओळखून तो त्वरित रोखण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना प्रभावी यंत्रणा विकसित करावी लागणार आहे.ऑस्ट्रेलियानंतर आणि फ्रान्ससारख्या देशांच्या पावलावर पाऊल ठेवत व्हिएतनामही अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावर कठोर नियंत्रण आणणाऱ्या देशांच्या यादीत सामील होण्याच्या तयारीत आहे. डिजिटल युगात मुलांचे ऑनलाइन संरक्षण अधिक मजबूत करण्यासाठी अशा प्रकारचे नियम भविष्यात इतर देशांमध्येही लागू होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

झिम्बाब्वेविरुद्धचा सामना कुठे पाहता येणार? योग्य माहिती जाणून घ्या?

आमदार नारायण कुचे यांच्या कारचा भीषण अपघात ३ जण गंभीर जखमी?

मग अट्टहास कशासाठी केला?