कर्जदार शेतकर्‍यांच्या याद्या बँकांकडून अपलोड, जमा होणार दोन लाख, आता कर्जमाफीचा मुहूर्त केव्हा?

शेतकरी कर्जमाफाची तारीख दोनदा हुकली. 30 जूनपूर्वी कर्जमाफी देण्याची हमी सरकारने गेल्यावर्षी दिली होती.(loan) कर्जमाफी दिल्यावरही सरकार त्यावर ठाम होते. ही तारीख हुकल्यानंतर 5 जुलै हा मुहूर्त काढण्यात आला. तोही टळला आहे. आयकर भरणारे शेतकरी हुडकायचे असल्याचे निमित्त करून कर्जमाफी पुढे ढकलण्यात आली. आता कर्जमाफीची नवीन तारीख काय असेल या प्रतिक्षेत शेतकरी आहे. त्याचवेळी इतर प्रक्रिया पूर्ण होत आहेत. बँकांनी त्यांच्याकडील थकीत कर्जदार शेतकऱ्यांच्या याद्या सरकारच्या पोर्टलवर अपलोड केल्या आहेत. आता सरकारने इतर कोणताही खोडा घातला नाही तर कर्जमाफी लवकर मिळू शकते.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आली आहे.

थकबाकीदार आणि कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेतून कर्जमाफी(loan) होईल. पावसाळी अधिवेशनात सरकारने 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. त्यासाठी 36 हजार 585 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. या योजनेतंर्गत पात्र कर्जदार शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ होईल. तर काही शेतकऱ्यांना 50 हजारांचा प्रोत्साहनपर लाभ मिळेल.थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड1 एप्रिल 2019 ते 31 2025 या कालावधीत अल्पमुदत पीक कर्ज प्राप्त आणि 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत थकीत कर्जदार शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.

थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडे अपलोड केल्या आहेत. (loan)आता सर्व सोपास्कार जवळपास पूर्ण झाले आहेत. आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची नावं वगळल्यावर आणि इतर काही खोडा घातला नाही तर कर्जमाफीची रक्कम पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. त्याचे कर्जखाते बेबाकी, निरंक होईल. त्यांना पुन्हा पीक कर्जासाठी अर्ज करता येईल.कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना कोणताही अर्ज करावा लागणार नाही. पात्र शेतकऱ्यांची यादी बँकांनी सरकारकडे अपलोड केली आहे.

यापूर्वी कर्जमाफीचा दोनदा मुहूर्त हुकला(loan) आहे. राज्यपाल महोदयांची स्वाक्षरी बाकी असल्याने 30 जूनचा मुहूर्त हुकला होता. 5 जुलै ही तारीख निश्चित झाली होती. यावेळी आयकर दाते शेतकरी शोध मोहीम हाती घेतल्याचे सांगत कर्जमाफी टळली. सरकारने अद्याप कर्जमाफीची नवीन तारीख जाहीर केलेली नाही. ही तारीख जाहीर करूनही सरकार त्याचवेळी कर्जमाफी देईल का? की अजून काही अडचण येईल याविषयी शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम आहे.

हेही वाचा :

इचलकरंजी बनली चिखलकरंजी नागरिक संतप्त महापौरांचे कामे थांबवण्याचे आदेश?

नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा कृष्णामाई दत्तगुरूंच्या भेटीला भाविकांची स्नानपर्वणी?

E20 पेट्रोलमुळे गाडीचे इंजिन खराब होणार का?