देवभाऊच्या मंत्रिमंडळात लाडक्या बहिणींना स्थान, तीन-तीन महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी

पुणे: राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारच्या(political issue) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोठा प्रभाव दिसून आल्याचं नेते सांगतात. राज्यातील लाडक्या बहिणींसह पक्षातील लाडक्या बहिणींना देखील आता महायुती स्थान देताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या 20 महिला आमदार विजयी झाल्या आहेत. यामध्ये भाजपाच्या 14, शिवसेनेच्या 2 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 4 महिला आमदारांचा समावेश आहे.

सध्या ज्या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी(political issue) फिक्स मानली जात आहेत त्यात भाजपाकडून पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ यांची नावे आहेत. तर राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांच्या नावांचा समावेश मंत्रीमंडळामध्ये करण्यात आला आहे.

राज्यात लाडकी बहीण योजना आणली. त्याचा लाभ सर्वसामान्य महिलांना मोठ्या प्रमाणावर झाला. आता विधानसभेमध्ये निवडून आलेल्या महिला आमदारांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. महायुतीतील जवळपास चार महिला आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची माहिती आहे.

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून अदिती तटकरे यांचे नाव प्रामुख्याने घेतलं जात आहे. तर भाजपाकडून पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ यांची नावे आहेत. याआधी देखील मंत्रिमंडळात त्यांच्याकडे महिला व बालविकास खात राहिलं आहे.

मंत्रिमंडळातील महिलांची संख्या वाढवण्यासाठी महायुती सरकार भर देत आहे. गेल्या महायुतीच्या सरकारमध्ये एकच महिला मंत्री होती. त्यानंतर आता चार महिला आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

महायुतीमध्ये जिंकून आलेल्या ज्या महिला आमदार आहेत, त्यांची संख्या वीस आहे. त्यापैकी 4 महिलांना मंत्रिपद देण्यात येणार आहेत. महिला आमदारांचे प्रोफाइल दिल्ली दरबारी आधीच पाठवण्यात आल्याची माहिती होती. त्यांच्या नावावर चर्चा झाली आहे. त्यानंतर आज या महिला आमदार देखील मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

भाजपच्या निवडून आलेल्या महिला आमदार
भाजपच्या सर्वात जास्त (14) महिला उमेदवार विजयी झाल्या आहे, 10 महिला आमदार या फेरनिवडून आलेल्या आहेत. यामध्ये श्वेता महाले (चिकली मतदारसंघ), मेघना बोर्डीकर (जिंतूर), देवयानी फरांदे (नाशिक मध्य), सीमा हिरे (नाशिक पश्चिम), मंदा म्हात्रे (बेलापूर), मनीषा चौधरी (दहिसर), विद्या ठाकूर (गोरेगाव), माधुरी मिसाळ (पर्वती), मोनिका राजळे (शेवगाव) आणि नमिता मुंदडा (कैज) यांचा समावेश आहे. तर श्रीजया चव्हाण (भोकर), सुलभा गायकवाड (कल्याण पूर्व), स्नेहा पंडित (वसई) आणि अनुराधा चव्हाण (फुलंब्री) या भाजपच्या चार नवीन महिला आमदार विजयी झाल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या आमदार
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या सुलभा खोडके (अमरावती), सरोज अहिरे (देवळाली), सना मलिक (अनुशक्तीनगर) आणि अदिती तटकरे (श्रीवर्धन) या महिल्या उमेदवार विजयी झाल्या आहेत. तर शिवसेना शिंदे गटाच्या मंजुळा गावित (साक्री) आणि संजना जाधव (कन्नड) या दोन महिला आमदार झाल्या आहेत.तर विरोधी पक्षात काँग्रेसच्या उमेदवार आणि खासदार वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गायकवाड (धारावी) या एकमेव महिला आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.

माधुरी मिसाळ यांना मंत्रीपदासाठी फोन
भाजप आमदार माधुरी मिसाळ यांना मंत्रीपदासाठी फोन आला आहे. याबाबत एबीपी माझाशी बोलताना त्या म्हणाल्या,2009 पासून मी आमदार आहे. माझी चौथी टर्म आहे आणि त्यामुळे मला विश्वास होता की, या वेळेस मंत्री पदासाठी माझ्या नावाचा विचार होईल. मला आता थोड्या वेळापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन आला आणि शपथविधीसाठी तुम्ही यावे असं सांगण्यात आलं. भाजप वरिष्ठांकडनं जी जबाबदारी दिली जाईल, ती जबाबदारी मी पार पाडेल. कोणताही विशेष खात्यासाठी आग्रह नाही, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

हेही वाचा :

या मूलांकांच्या लोकांची कायदेशीर अडचणीतून सुटका होण्याची शक्यता

शिवसेना फुटली, छगन भुजबळांचं बंड अन्…; 33 वर्षांनंतर आज पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार

यंदा विराट कोहली नाही तर ‘हा’ युवा क्रिकेटर बनू शकतो RCB चा नवा कर्णधार