सर्वसामान्यांना मोठा झटका, घाऊक महागाईने गाठला १६ महिन्यांतील उच्चांक

आधीच महागाईचे चटके सहन करत असलेल्या सर्वसामान्यांना(wholesale) आणखी एक मोठा झटका बसला आहे. घाऊक महागाईचा दर आता ३.३६ टक्के इतका झाला आहे. विशेष बाब म्हणजे, गेल्या १६ महिन्यांतील हा उच्चांक दर आहे. नुकतीच वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जून महिन्यातील घाऊक महागाईची आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीतून घाऊक महागाईचा दर वाढला असल्याचं स्पष्ट झालं.

मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात महागड्या(wholesale) भाज्यांमुळे घाऊक महागाईचा दर वाढला आहे. खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतीमुळे घाऊक महागाईचा दर वाढल्याचं बोललं जातंय. उत्पादित अन्नपदार्थ, कच्चे पेट्रोलियम पदार्थ आणि नैसर्गिक वायू तसेच खनिज तेलाच्या वाढत्या किमतीचा परिणाम महागाईच्या दरावर झाला आहे.

विशेष बाब म्हणजे, यापूर्वी मे महिन्यांत घाऊक महागाईचा दर २.६१ टक्के इतका होता. मात्र, जून महिन्यात हाच दर ३.३६ टक्क्यांवर पोहचलाय. तसेच अन्नधान्याचा महागाई दरही जूनमध्ये ८.६८ टक्क्यावर गेला आहे. हाच दर मे महिन्यात ७.४० टक्के इतका होता. यामुळे आधीच महागाईचा मार सोसणाऱ्या जनतेला आणखीच त्रास सहन करावा लागणार आहे.

घाऊक महागाई दर कुठे वाढला अन् कमी झाला?
-मे महिन्यात प्राथमिक वस्तूंच्या महागाईचा दर ७.२० टक्के इतका होता. जो आता जूनमध्ये ८.८० टक्के झाला आहे.

-इंधन आणि उर्जा विभागाच्या घाऊक महागाई दरात किंचित घट झाली आहे. हा दर मे महिन्यात १.०३ इतका होता. जो आता जूनमध्ये १.३५ टक्के झाला आहे.

-उत्पादन उत्पादनांच्या महागाई दरातही वाढला असून १.३४ टक्के इतका झाला आहे. मे महिन्यात हा आकडा ०.७८ टक्के इतका होता.

-जून महिन्यात अंडी, मांस आणि मासे यासारख्या खाद्यपदार्थांमध्ये घट झाली असून ती शून्याच्या खाली गेली आहे. जूनमध्ये अंडी, मांस आणि मासे यांच्या महागाईचा दर -२.१९ टक्के आहे. मे महिन्यात हाच दर १.५८ टक्के होता.

-जूनमध्ये डाळींच्या महागाईचा दरातही मोठी वाढ झाली असून तो २१.४ टक्यांनी वाढला आहे. ज्यामुळे डाळींचे भाव कडाडण्याची शक्यता आहे.

-जून महिन्यात किरकोळ महागाई वाढ ५.१ टक्क्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे.

हेही वाचा :

जेवणाच्या टेस्टवरून आचाऱ्याचा हातोड्याने वार करून खून

ना मला राजकारणाची पर्वा, ना मंत्रिपद, ना आमदारकीची, पवारांच्या भेटीचं गूढ भुजबळांनी उलगडलं

‘स्थानिक आमदार सरकारसोबत…,’ विशाळगडाच्या अतिक्रमणावरून संभाजी राजेंचा गंभीर आरोप