UPI वापरात मोठा बदल! १ ऑगस्टपासून ५ नवे नियम; थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

देशातील कोट्यवधी लोक यूपीआयचा वापर करतात.(UPI)यूपीआयचा वापर करुन भाजी घेण्यापासून ते कोणालाही पैसे पाठवता येतात. यूपीआयमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. दरम्यान, आता यूपीआयच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. १ ऑगस्ट २०२५ पासून हे नवीन नियम लागू होणार आहे.यूपीआयच्या नियमांत बदल झाल्याने फोनपे, गुगल पे, पेटीएम या अॅपवर परिणाम होणार आहे. यातील काही नियमातं बदल होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यूपीआयचा वापर अधिक जास्त, सुरक्षित व्हावा, यासाठी हे नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

आता १ ऑगस्टपासून बॅलेंस चेक करण्याच्या लिमिटमध्ये बदल झाले आहे. आता तुम्ही दिवसाला फक्त ५० वेळाच यूपीआयवरुन बॅलेंच चेक करु शकतात. दरम्यान,सारखा बॅलेंस चेक केल्यावर सर्व्हरवर दबाव पडतो. त्यामुळे ट्रान्झॅक्शन व्हायला वेळ लागतो.अनेकांचे एका मोबाईल नंबरवरुन अनेक बँक खाती असतात. (UPI)फोन नंबरशी लिंक बँक खात्यातील बॅलेंस तुम्ही फक्त २५ वेळा चेक करु शकतात.

पेमेंट स्टेट्‍स
आता यूजर्स व्यव्हार करताना पेमेंटचा स्टेट्‍स दिवसातून फक्त तीनवेळा चेक करु शकतात.तीन वेळा चेक करताना मध्ये कमीत कमी ९० सेकंडचे अंतर असावे.

ऑटोपे ट्रान्झॅक्शनमध्ये बदल
आता विविध प्लॅटफॉर्मसाठी ऑटोपे करण्याची वेळ निश्चित केली जाईल. सकाळी दहा वाजताच्या आधी, दुपारी १ ते ५ आणि रात्री ९.३० नंतर तुम्ही ऑटोपे करु शकतात.

पेमेंट रिवर्सलची लिमिट
चार्जबॅक म्हणजेच पेमेंट रिवर्सलची लिमिटदेखील निश्चित करण्यात आली आहे. (UPI)आता तुम्ही एका महिन्यात १० वेळा आणि एका व्यक्तीकडून ५ वेळाच चार्जबॅक मागू शकतात.

हेही वाचा :

खुशखबर! सोन्या – चांदीच्या दरात पुन्हा घसरण!

लाडक्या भावासाठी घरी बनवा सोपा आणि झटपट तयार होणारा गव्हाच्या पिठाचा शिरा

लाडकी बहीण योजनेत मोठा गोंधळ; 26.34 लाख अपात्र लाभार्थी, जुलैचे पैसे मिळणार का?