मोठी बातमी लागोपाठ ४ दिवस बँका बंद राहणार?

तुम्ही बँकांते व्यवहार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संयुक्त संस्था युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांनी ११ सप्टेंबर रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. (Banks) त्यामुळे सरकारी बँकांच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून, ग्राहकांना सलग चार दिवस बँकिंग सेवांमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

UFBU च्या मते, आठवड्यात पाच दिवस बँका सुरू ठेवण्याचा निर्णय रखडणं, परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) संदर्भातील मतभेद आणि पेन्शनशी संबंधित मागण्या ही संपाची महत्त्वाची कारणं आहेत.११ सप्टेंबरला शुक्रवार असल्यामुळे त्यानंतर शनिवार आणि रविवारची साप्ताहिक सुट्टी आहे. (Banks) त्यातच १४ सप्टेंबरला काही राज्यांमध्ये गणेश चतुर्थीची सुट्टी असल्यामुळे काही भागांत बँका सलग चार दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. मात्र, सुट्ट्यांमुळे होणारा परिणाम राज्यनिहाय वेगळा असू शकतो.

UFBU ने सरकार आणि बँक व्यवस्थापनाने मागण्यांकडे लक्ष दिलं नाही तर २८ सप्टेंबरपासून तीन दिवसांचा सलग संप करण्याचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे ही वेळ सहामाही लेखा-जोख्य्याच्या दिवसांशी संबंधित असल्याने बँकिंग व्यवहारांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. मागण्या मान्य न झाल्यास २६ ऑक्टोबरपासून अनिश्चितकालीन संप करण्याचा इशाराही संघटनांनी दिला आहे.UFBUच्या म्हणण्यांनुसार, भारतीय बँक संघाने मार्च २०२४ मध्ये झालेल्या १२ व्या द्विवार्षिक करारांतर्गत आठवड्यात पाच दिवस बँकिंग करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. सोमवार ते शुक्रवार कामकाज ठेवून दररोज कामाचे तास ४० मिनिटांनी वाढवण्याचा प्रस्ताव होता. (Banks) मात्र सरकारची अंतिम मंजुरी अजून रखडलेली असल्याचा संघटनांचा दावा आहे.

हेही वाचा :

केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची थलपती विजय यांनी घेतली भेट, केल्या या दोन मोठ्या मागण्या?

शिंदेंच्या या खासदाराला 100 टक्के मंत्रिपद मोंदीच्या मंत्रिमंडळात थेट विधानाने चर्चेला उधाण?

शरद पवारांबरोबरच्या बैठकीत काय घडलं पार्थ पवार काय म्हणाले अखेर बातमी आली समोर?