मोठी बातमी, 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आठवा वेतन; ‘या’ लोकांना होणार बंपर फायदा

संसदेचा अधिवेशन सुरु असून या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत मोठी घोषणा केली आहे. देशात 1 जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू होणार असल्याची माहिती पंकज चौधरी यांनी दिली आहे. आठवा वेतन लागू झाल्यानंतर संपूर्ण देशातील सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन(salary), पेन्शन आणि भत्ते वाढणार आहे.

तसेच सरकारी विभाग आणि राज्य सरकारांकडून सूचना मागवल्या आहेत आणि वेतन(salary) आयोगाचे उद्दिष्ट महागाई आणि आर्थिक स्थितीच्या आधारावर कर्मचाऱ्यांचे उत्पन्न संतुलित करुन त्यांचे राहणीमान सुधारणे आहे. असं देखील अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले.

आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्र सरकारने 16 जानेवारी 2025 रोजी मान्यता दिली होती. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली होती की, आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू करता येतील, कारण 7 व्या वेतन आयोगाचा कालावधी 31 डिसेंबर 2025 रोजी संपणार आहे. वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 ते 68 लाख पेन्शनधारकांना फायदा होईल.

वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर, पगारातील वाढ फिटमेंट फॅक्टरवर आधारित असेल. फिटमेंट फॅक्टर जितका जास्त असेल तितका मूळ पगार वाढेल.

फिटमेंट फॅक्टर हा एक प्रकारचा गुणक आहे. वेतन आयोगाच्या बाबतीत हा घटक वापरला जातो. वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या नवीन पगाराची गणना करण्यासाठी फिटमेंट फॅक्टरचा वापर केला जातो. या घटकाचा वापर जुन्या ते नवीन पगारात एकसमान वाढ सुनिश्चित करतो. सातव्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर 2.57 आहे. आठव्या वेतन आयोगात फिटमेंट सेक्टर 1.90, 2.08, 2.68 यापेक्षा कमी किंवा जास्त असू शकतो.

हेही वाचा :

एसटी अन् दुचाकीचा भीषण अपघात, 2 जण ठार; भरधाव बसने दुचाकीला फरफटत नेलं

क्षणातच शार्क माशाने व्यक्तीला चावून चावून खाल्लं; रक्तरंजित पाणी अन् Video Viral

शॉकिंग! रुग्णालयातील तरुणीला नशेखोर तरुणाकडून बेदम मारहाण; शिवीगाळ करत विनयभंग