मागील वर्षी झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा दणदणीत विजय झाली.(president) त्यानंतर आता भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीबाबत दिल्लीतून महत्तवाची अपडेट समोर आली आहे.काही दिवसांपूर्वी भाजपने जिल्हाध्यक्षांच्या नियुकत्या जाहीर केल्या. जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीनंतर आता भाजपच्या गोटा नव्या प्रदेशाध्यक्षपदाची निवडही अंतिम टप्प्यात आली आहे.भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर त्यांच्याकडची प्रदेशाध्यक्ष पदाची संधी भाजप कुणाला देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यादरम्यान दिल्लीतून भाजपच्या गोटातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीला आता गती मिळाली असून, पक्षाच्या दिल्लीतून केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष निवड प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपने रिजिजू यांच्यावर ही जबाबदारी सोपवून मोठं पाऊल उचललं असून, नव्या नेतृत्वाबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत मिळत आहेत.पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील आठवड्याभरात महाराष्ट्र भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. सध्या या पदासाठी काही प्रमुख नावांची चर्चा असून, अंतिम निवडीसाठी केंद्रीय नेतृत्वाकडून व्यापक आढावा घेतला जात आहे.(president)भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद असा नियम असल्यामुळे चंद्रशेखर बानवकुळे यांच्याकडे असलेले प्रदेशाध्यक्षपद कुणाला मिळणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सध्या किरेन रिजिजू यांच्याकडे संसंदीय कामकाज मंत्री म्हणूनक काम करत असून त्यांच्याकडे महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीची जबाबदारी देण्यात आली आहे.
अशातच राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका होणार आहेत.त्यामुळे भाजपकडून प्रदेशाध्यक्ष पदी नवख्या चेहऱ्याला संधी मिळणार की अनुभवी चेहऱ्याला संधी दिली जाते, याबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी मंत्रिपदाची संधी न मिळालेले रवींद्र चव्हाण आणि डॉ. संजय कुटे यांची नावे आघाडीवर आहेत. त्यातही रवींद्र चव्हाण यांचे नावाची सर्वाधिक चर्चा आहे.
महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेला वेग आला असताना, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे नाव चर्चेत आहे. तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारमध्ये त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहिले होते. कोकणात भाजपला मिळालेल्या मोठ्या यशामागे त्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे मानले जाते.(president)चव्हाण हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळे पक्षांतर्गत समीकरणात त्यांना मजबूत पाठिंबा मिळू शकतो. तसेच, जर भाजपने प्रदेशाध्यक्षपद मराठा समाजातील नेत्याला देण्याचा निर्णय घेतला, तर रवींद्र चव्हाण यांच्या नावाला प्राधान्य मिळण्याची शक्यता अधिक बळावते. पक्षाच्या दिल्लीतील नेतृत्वाने केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केल्याने प्रदेशाध्यक्ष निवडीच्या हालचालींना वेग आला आहे. आगामी आठवडाभरात महाराष्ट्र भाजपला नवे नेतृत्व मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा :
वणवा पेटण्यास सुरूवात, हिंदी सक्तीविरोधात भाजपात पहिला राजीनामा
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार