मुंबईतील चर्चगेटजवळील आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या जवळपास 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. चर्चगेट स्टेशन जवळच्या आयकर विभागाच्या कार्यालयाला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या जवळपास 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशन दलाच्या जवनांकडून ही आग विझवण्याचे, ती आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. (Churchgate) आग कशामुळे लागली ते कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यात सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही.
चर्चगेट स्टेशनजवळ असलेल्या आयकर विभागच्या कार्यालयाला लागलेल्या आगीमुळे चहूकडे धुराचं साम्राज्य पसरल आहे. नागरिकांमध्येही भीतीच वातावरण आहे. आग लगाली तेव्हा आयकर विभागाच्या कार्यालयात काही कर्मचारी देखील होते, मात्र आगीचे वृत्त समजताच त्यांना बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे काहीशी धावपळ उडाली होती. आतमध्ये आणखी कोणी अडकलं का याचा शोध घेतला जात असून अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कसून प्रयत्न केले जात आहेत. या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. चर्चगेट स्टेशनजवळच आयकर विभागाचं मोठं कार्यालय आहे.(Churchgate) मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यालयाच्या तळमजल्यावरच सोमवारी दुपारी ही आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केलं. आगीमुळे धुराचे मोठमोठाले लोट कार्यालयातून बाहेर पडताना दिसत आहे, आगीने मोठा पेट घेतला असून हळहूळ ती संपूर्ण तळमजल्यावर पसरत चालली आहे. अग्निशामक दलाच्या 8 गाड्या या घटनास्थळी पोहोचल्या असून त्यांनी तातडीने आग विझवण्याचं काम सुरू केलं.
ज्या आयकर विभागच्या कार्यालयाला आग लागील, तेथील काही प्रत्यक्षदर्शींनी त्यावेळची माहिती दिली. त्यांच्या सांगण्यानुसार, एक तासाभरापूर्वी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे. शॉर्ट सर्किटचं कारण म्हणजे, जेव्हा वायर पेटते, तेव्हा पहिले त्या वायरीचा वास येतो. (Churchgate) त्या धुराचा वास आला आणि समजलं की आग लागल्ये, असं एकाने सांगितलं. या कार्यालयातील बेसमेंटमध्ये 10 नंबर रूमला आग लागली आहे, मात्र सुदैवाने ही आग अजून पहिल्या माळ्यापर्यंत वगैरे पोहोचलेली नाहीये, ना तळ मजल्यावर. इन्कम टॅक्स कार्यालयाला खाली बेसमेंट आहे, तिथल्या 10 व्या रुमला आग लागली आहे, असंही त्यांनी नमूद केलं. आग लागल्यावर पहिल्या मजल्यावर दोन जण अडकले होते, पण ते कर्मचारी नव्हते, घाबरून ते एका रुममध्ये बसले होते, असंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. अग्निशामक दलाच्या जवनांकडून आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू असून, कार्यालयात कोणीही अडकलं का याचाही शोध घेतला जात आहे. मात्र मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगीमुळे चहूकडे धुराचे लोट असून काळ्या धुराचं साम्राज्य पसरल आहे.
हेही वाचा :
धीरज परदेशीची भगव्या टिळ्यामुळे हत्या का? संग्राम जगताप यांच्या मागण्या काय?
तुम्ही नालायक गृहमंत्री राजीनामा द्या, पृथ्वीराज चव्हाण अमित शहांवर संतापले?