राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाला मनसेनं मोठा धक्का दिला आहे. मनसेमध्ये मोठा पक्ष प्रवेश झाला असून, मुंबईमध्ये घडामोडींना वेग आला आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला हे यश टिकवून ठेवता आलं नाही. विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार पुनरागमन केलं. राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आली. भाजप हा विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. तर शिवसेना शिंदे गटाला देखील चांगलं यश मिळालं. (political) दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या विजयानंतर महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी देखील हेच चित्र कायम होतं. महाविकास आघाडीला या काळात अनेक धक्के बसले. दरम्यान काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटाने शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला होता. शिवसेना ठाकरे गटाच्या 9 खासदारांपैकी 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का होता. (political) परंतु आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाला धक्का देणाऱ्या शिवसेना शिंदे गटाला आता मनसेनं मोठा धक्का दिला आहे.
दक्षिण रत्नागिरीमधून मोठी बातमी समोर येत आहे. दक्षिण रत्नागिरीतील छावा संघटना आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आज मनसेत प्रवेश केला आहे. दादरच्या मनसे कार्यालयात अमित ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष धावडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यंनी मनसेमध्ये पक्षप्रवेश केला आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या जवळपास 100 ते 150 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील मनसेमध्ये प्रवेश केला आहे. हा शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर या पक्ष प्रवेशामुळे आता दक्षिण रत्नागिरीमध्ये मनसेला बळ मिळणार आहे. (political) दरम्यान गेल्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मनसेनं शिवसेना ठाकरे गटासोबत युती केली होती. परंतु या निवडणुकीमध्ये देखील मनसेला अपेक्षीत असं यश मिळू शकलं नव्हतं. सुरुवातीला शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून भाजप आणि शिवसेना शिंदे गटासमोर मोठं आव्हान निर्माण करण्यात आलं, परंतु शेवटी मुंबईमध्ये भाजपचाच महापौर झाला.
हेही वाचा :
दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर कधीपासून सुरू होणार परीक्षा
शरद पवारांना सुनेत्रा पवार भेटल्याच नाहीत, तीन वेळा वेळ घेतला, पण तर्कवितर्कांना उधाण
इचलकरंजीतील राजाराम स्टेडीयमचे रूपडे पालटणार आधुनिकीकरणासाठी ५ कोटी मंजूर