राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ई-केवायसी प्रक्रिया, पडताळणी आणि तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिलांना योजनेचा लाभ वेळेवर मिळाला नव्हता. (Ladki Bahin Yojana) त्यामुळे हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य सरकारने मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी १० जून रोजी ३४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. महिला व बालविकास विभागामार्फत हा निधी थेट लाभार्थींच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (Ladki Bahin Yojana) त्यानुसार १५ जूनपासून टप्प्याटप्प्याने निधी वितरणाला सुरुवात झाली असून अनेक महिलांच्या खात्यात १,५०० रुपये जमा झाले आहेत.यापूर्वी शासनाने मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते एकत्रित स्वरूपात वितरित केले होते. त्यानंतर मे महिन्याच्या हप्त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ई-केवायसी पूर्ण करूनही अनेक महिलांना लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. मात्र आता निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्याने लाभार्थींमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, काही महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाल्यानंतरही बँकेकडून एसएमएस प्राप्त झालेला नाही. तांत्रिक अडचणी, सर्व्हरवरील ताण किंवा संदेशवहनातील विलंबामुळे असे होत असल्याची माहिती मिळत आहे. (Ladki Bahin Yojana) त्यामुळे खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही, याबाबत अनेक महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.अधिकाऱ्यांनी लाभार्थींना घाबरून न जाता बँक खाते किंवा संबंधित मोबाईल बँकिंग सुविधेद्वारे खात्याची शिल्लक तपासण्याचे आवाहन केले आहे. निधी वितरण प्रक्रिया सुरू असून पात्र महिलांच्या खात्यात लवकरच मे महिन्याचा हप्ता जमा होईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा :
पाऊस लांबल्यामुळे वाढली पाणीटंचाईची धग