नरेंद्र मोदी यांना आजवरचा सर्वात मोठा झटका, मतदार संघातच भाजपचा पराभव MLCचा धक्कादायक निकाल

पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या वाराणसी मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघात भाजप उमेदवाराचा पराभव झाला असून, समाजवादी पार्टीने विजय मिळवला आहे. या निकालानंतर काँग्रेस आणि आपच्या नेत्यांनी मोदींवर टीका केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही मोदींचे मताधिक्य घटले होते, यामुळे त्यांच्या जनाधाराला धक्का लागत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

देशभरातील विधान परिषदेच्या 28 जागांचे निकाल आले आहेत. या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या असून या निवडणुकीत काँग्रेसला अवघी एकच सीट जिंकता आली आहे. (Narendra Modi) त्यामुळे सत्ताधारी भाजपने काँग्रेसची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काँग्रेसची खिल्ली उडवली आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आजवरचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या वाराणासी लोकसभा मतदारसंघातच भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडून मोदींवर जोरदार टीका होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदार असलेल्या वाराणासी मतदारसंघाच्या शिक्षक मतदारसंघावर समाजवादी पार्टीने वर्चस्व मिळवलं आहे. या ठिकाणी समाजवादी पार्टीचे उमेदवार लाल बिहारी यादव हे एकूण 11,612 मतांनी विजयी झाले आहेत. यादव यांनी भाजपचे उमेदवार प्रमोद मिश्रा यांचा पराभव केला आहे. मिश्रा यांना या निवडणुकीत 6,597 मते मिळाली आहेत. 5015 हजार मतांच्या फरकांनी यादव यांनी भाजपच्या मिश्रा यांना धूळ चारली आहे. मोदींसाठी हा आजवरचा सर्वात मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. हा निकाल येताच काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदींनी दुसऱ्यांना प्रवचन देण्याऐवजी आपल्या घरात काय घडलं (Narendra Modi) त्याचं आत्मपरीक्षण करावं. कारण मोदींच्या वाराणासी मतदारसंघात आणि आरएसएसचा गड असलेल्या नागपूरमध्ये भाजपचा पराभव झाला आहे, असा टोला जयराम रमेश यांनी लगावला आहे.

या निकालानंतर आपचे राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. मोदी वाराणासीत पराभूत झाले आहेत. तरीही तिथे गडबड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. रिकाऊंटिंग केल्यानंतरही त्यांचा उमेदवार पराभूत झाला आहे. ज्ञानू, आता विजयाचं प्रमाणपत्र द्या. तुमचे आका आले आहेत, अशी टीका संजय सिंह यांनी केली आहे. (Narendra Modi) दरम्यान, लोकसभा निवडणुकीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्यांच्याच मतदारसंघात जनाधार घटत असल्याचं चित्र आहे. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विजयाचं अंतर केवळ 1 लाख 52 हजार मतांचं होतं. मोदींच्या विजयासाठी डझनभर मंत्र्यांनी वाराणासीत तळ ठोकला होता. तरीही विजयाचं मार्जिन वाढवण्यात त्यांना यश आलं नव्हतं.

2019मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी 4 लाख 80 हजाराचं मताधिक्य मिळवलं होतं. म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकीत मोदींची जवळपास 3 लाख 30 हजार मते घटली होती. 2024मध्ये काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने थोडी रणनीती आखून निवडणूक लढली असती तर मोदी या निवडणूक पराभूतही झाले असते, असं जाणकारांचं म्हणणं आहे. काल झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही मोदींच्याच मतदारसंघात त्यांच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने मोदींच्या लोकप्रियतेला ग्रहण लागल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा : 

सर्वात मोठी बातमी जय पवार थेट सीआयडी कार्यालयात काय आहे प्रकरण

BMC कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, दिवाळीपूर्वी इतके रुपये मिळणार

मनोज जरांगे दारू पितात का काय दिलं उत्तर म्हणाले, मी आत्महत्याच