भाजप की शिंदे गट, ठाणे जिल्हा बँकेचं अध्यक्षपद कोणाकडे जाणार?

ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने वर्चस्व सिद्ध केलंय. त्यानंतर आता अध्यक्षपद कोणाकडे जाणार, (Central) याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पॅनल पद्धतीने झालेल्या निवडणुकीत महायुतीचे घटकपक्ष असलेल्या भाजप आणि शिंदे गटाच्या शिलेदारांनी जिंकली. या निवडणुकीत ‘परिवर्तन पॅनल’ला पराभव स्वीकारावा लागला. तर ‘सहकार पॅनल’ने वर्चस्व प्रस्थापित केले. या विजयानंतर आता बँकेच्या अध्यक्षपदी कोण होणार, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. ठाणे जिल्हा बँकेचं अध्यक्षपद भाजप की शिंदे गटाकडे जाणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. याबाबतचा अंतिम फैसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत गेल्या अनेक वर्षांपासून बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व राहिलं आहे. बहुजन विकास आघाडीकडून बँकेतील सत्तेच्या चाव्या महायुतीला यश आलं. या बँकेच्या निवडणुकीत ‘सहकार पॅनल’च्या माध्यमातून एकनाथ शिंदेंचे उमेदवार उभे होते. (Central) तर काही किसन कथोरे यांच्या नेतृत्वात भाजपचे उमेदवार उभे होते. तर दुसरीकडे ‘परिवर्तन पॅनल’मध्येही भाजपचे ४ आणि एकनाथ शिंदे यांच्या ३ उमेदवार उभे होते. ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपचे 8 उमेदवार निवडून आले. तर 5 उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत 21 जागांसाठी बहुमतासाठी 11 उमेदवारांची गरज होती. मात्र, महायुतीते 13 उमेदवार विजयी झाले. ठाणे जिल्ह्यांचे लक्ष असलल्या या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांची खेळी यशस्वी ठरली. या निवडणुकीच्या निकालातून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला धक्का बसलाय.

बँकेच्या निवडणुकीत वर्चस्व सिद्ध केल्यानंतर अध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सत्तेबाबतचा पुढील निर्णय महायुतीचे वरिष्ठ नेते घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Central) याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याची चर्चा आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चाव्या महायुती स्वत:कडे ठेवणार की, बहुजन विकास आघाडीकडे सुपूर्द हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच बँकेचं अध्यक्षपद भाजप की शिंदे गटाकडे जाणार याकडेही साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

हेही वाचा :

मी बोलायला लागलो, तर सहन होणार नाही..!

महाबळेश्वरला जाताय तर सावधान पर्यटकांसाठी प्रसिद्ध पॉईंट बंद?

Jio आणि Airtel यूजर्स सावधान Gmail खात्याबाबतची ही चूक ठरू शकते धोकादायक?