दाऊदच्या साम्राज्याला हादरा, कुख्यात ड्रग्स तस्कर सलीम डोलाच्या पंटरला दणका, फैसल शेखसह 10 जणांविरोधात ED चे आरोपपत्र?

दाऊद इब्राहिमच्या देशातील काळ्या धंद्यांना जोरदार चपराक लगावण्यात आला आहे.(dawood) अवैध व्यवसायातून मोठी आर्थिक उलाढाल दाऊदची गँग करते. यामध्ये ड्रग्ज तस्करीचे मोठे रॅकेट चालवले जाते. गेल्यावर्षी अंमलबजावणी संचालनालयाने, ईडीने दाऊदचा निकटवर्तीय सलीम डोलाच्या ड्रग्ज नेटवर्कवर मुंबईत 8 ठिकाणी धाडी घातल्या होत्या. याप्रकरणात डोलाचा एमडी ड्रग्ज तस्कर फैसल शेख याच्यासह त्याची पत्नी अल्फिया शेख आणि इतर 8 जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. या धाडसत्रामुळे दाऊदच्या साम्राज्याला मोठा हादरा बसला होता. या दहा जणांविरोधात ED ने आता आरोपपत्र दाखल केले आहे.

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो च्या कारवाई आधारे आणि मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीने धडक कारवाई केली आहे. मेफेड्रॉन या घातक ड्रग्ज तस्करी प्रकरणात गेल्यावर्षी दाऊदच्या पंटरवर मोठी कारवाई करण्यात आली होती. फैसल शेख हा सलीम डोलासाठी काम करत होता. त्याची पत्नी अल्फिया शेखही या गँगमध्ये होती. या दोघांसह इतर आठ जणांना अटक करण्यात आली होती. (dawood)ड्रग्ज तस्करी रॅकेटची सूत्र ते हलवत होते. सामिया खान, नासिर यासिन खान आणि इतर जण एमडी ड्रग्जची विक्री करत होते. ग्राहकांना शोधण्याचे काम त्यांचे होते. फैसल आणि अल्फिया ड्रग्ज विक्रीतून झालेली कमाई त्यांच्या बँक खात्यात ठेवत होते. त्याची संपूर्ण कुंडली ईडीने बाहेर काढली आहे.

गुन्ह्यासाठी विविध बँक खात्याचा वापर
शेख दाम्पत्य जमा झालेला पैसा त्यांचा एक साथीदार फैजान मोहम्मद शफी शेख जो, फैज कॉम्प्लेक्स, मुंबई येथे काम करत होता, त्याच्याकडे पाठवत असे. तिथून हा पैसा विविध बँक खात्यात पाठवण्यात येत असे. विविध बँक खात्याचा वापर करत अवैध व्यवसायातील पैसा त्यांच्या साथीदारांमार्फत सलीम डोला आणि पुढे दाऊदपर्यंत पोहचवण्याची व्यवस्था करण्यात येत होती. त्यासाठी अनेक बोगस फर्म, उपकंपन्यांचे मोठे जाळे तयार करण्यात आले होते.

सलीम डोला हाच मास्टरमाईंड
दादचा जवळचा सलीम डोला हा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर आहे. देशातील अनेक ठिकाणी पकडलेल्या ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे थेट डोलाशी जोडले जातात. सलीम डोलाच्या मुलाला गेल्यावर्षी दुबईतून हद्दपार (dawood)करण्यात आले होते. सलीमचा मुल गा ताहिर हा सुद्धा ड्रग्स तसेच इतर अवैध धंदात सक्रिय होता. त्यातच या रॅकेटचा एक मुख्य सूत्रधार फैसल शेख, त्याची पत्नी अल्फिया शेख आणि इतर आठ जणांविरोधात ईडीने आता दोषारोपपत्र दाखल केले आहे.

हेही वाचा :

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?

सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?

रोहित शर्मा रिटायर होणार? टीम इंडियाच्या कोचने दिल उत्तर?