बॉलिवूडच्या प्रसिद्ध रॅपरचा भीषण कार अपघात; चालत्या कारमधून फेकला गेला, व्हिडीओ व्हायरल

भारतीय हिप-हॉप जगतातील प्रसिद्ध रॅपर एमीवे बंटाई दुबईमध्ये आपल्या आगामी म्युझिक व्हिडीओच्या शूटिंगदरम्यान अपघातग्रस्त झाला आहे. या अपघाताचा(accident) व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. व्हिडीओमध्ये एमीवे एका चालत्या कारच्या खिडकीवर बसलेला दिसतो, आणि कार थांबताच तो थेट रस्त्यावर तोंडावर आपटतो.

या अपघातामुळे(accident) एमीवेला गंभीर दुखापत झाली असून, नेमकी जखम किती तीव्र आहे याबाबत अद्याप स्पष्टता नाही. एमीवेने स्वतः आपल्या यूट्यूब चॅनलवर एक व्हीलॉग टीझर शेअर केला आहे, ज्यात अपघाताचा क्षणही टिपलेला आहे. हा अपघात हेतुपुरस्सर स्टंट करताना घडला की चुकून घडलेला प्रकार आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

“स्टंट करताना चूक झाली…” – एमीवे बंटाई :
एमीवेनं आपल्या इंस्टाग्रामवर हा अपघाती व्हिडीओ शेअर करत लिहिलंय की, “स्टंट करताना चूक झाली…” या पोस्टनंतर त्याचे चाहते प्रचंड काळजीत पडले असून, त्याच्या प्रकृतीबद्दल विचारणा करत आहेत. चाहत्यांनी “तू आमच्यासाठी खूप मेहनत करतोस, आता आमची प्रार्थना तुझ्यासोबत आहे,” अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दुबईच्या शारजाह भागात ‘दुबई कंपनी’ या आगामी म्युझिक व्हिडीओचे शूटिंग सुरू असून, त्या दरम्यान ही घटना घडली. एमीवे बंटाई स्वतःच्या स्टाईलसाठी आणि दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो. मात्र या घटनेनंतर सोशल मीडियावर “स्टंट करताना सुरक्षितता महत्त्वाची” या चर्चेलाही उधाण आलं आहे.

कोण आहे एमीवे बंटाई? :
एमीवे बंटाई, ज्याचं खरं नाव मोहम्मद बिलाल शेख आहे, यानं २०१३ मध्ये ‘ग्लिंट लॉक’ या इंग्रजी रॅपने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर वडिलांच्या सल्ल्याने त्याने हिंदीमध्ये रॅपिंग सुरू केलं. २०१४ मध्ये आलेलं ‘और बंटाई’ हे गाणं त्याचं पहिले हिट ठरलं. त्यानंतर ‘मचेंगे’, ‘फिर से मचेंगे’, ‘बंटाई’ यांसारख्या गाण्यांनी त्याला भारतात सर्वाधिक लोकप्रिय रॅपर्सपैकी एक बनवलं.

त्याची रॅप शैली, उर्जा आणि रिअल लाईफवर आधारित गाणी ही तरुणांमध्ये विशेष पसंतीस उतरतात. त्यामुळेच या अपघाताची बातमी कळताच त्याचे चाहते सोशल मीडियावर त्याच्या प्रकृतीबद्दल प्रार्थना करत आहेत.

हेही वाचा :

नीता अंबानींची अनोखी साडी, तयार करण्यासाठी लागले तब्बल 10 महिने!

१० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट लाल भोपळ्याचे भरीत, पावसाळ्यात पचनासाठी ठरेल अतिशय हलका पदार्थ

काळेकुट्ट ढग, ताशी 30-40 किमी वेगानं वादळी वारे; 24 तासांत पावसाचं हे रुप भीती वाढवणार