उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात(lawyers)असलेल्या एसएसपी कार्यालयाजवळ दोन महिला वकिलांमध्ये चेंबरवरून वाद निर्माण झाला. हा वाद इतका वाढला की प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. महिला वकिलांमधील हाणामारी पाहून मोठ्या संख्येने लोक जमले. हा हाणामारीचा मुद्दा इतका तापला की घटनास्थळी गोंधळ उडाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, व्हिडिओमध्ये दिसणीऱ्या महिला वकिलांमध्ये चेंबरवरून आधीच वाद सुरू होता. हा वाद इतका वाढला की एका महिलेने दुसरीचे केस धरले आणि तिला सार्वजनिक ठिकाणी मारहाण करण्यास सुरुवात केली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ही हाणामारी झाली.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दोन्ही महिला एकमेकांना लाथा आणि बुक्के मारताना दिसत आहेत. आणि या हाणामारीत आणखी एक महिलाही सहभागी असल्याचे दिसून येत आहे(lawyers).ही संपूर्ण घटना नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केली. घटनेदरम्यान घटनास्थळी मोठ्या संख्येने लोक जमले होते, परंतु कोणीही हाणामारी थांबवण्यासाठी पुढाकार घेतला नाही.

सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या घटनेने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण केला आहे. सीओ सिटी भूषण वर्मा यांनी माध्यमांना सांगितले की,”मला या घटनेची माहिती मिळाली आहे आणि त्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. (lawyers)परंतु, अद्याप कोणत्याही महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली नाही. जर तक्रार आली तर चौकशीनंतर कारवाई केली जाईल.”
मथुरा कोर्ट मे महिला वकीलो की मारपीट!
— राष्ट्रीय बजरंगदल FBD (@Bajrangdal302) July 18, 2025
कानून के रक्षक ही जब कानून तोड़े ,
तो न्याय की उम्मीद किससे करें?
भीड तमाशबीन थी…
क्योकि "रील" चाहिए, इंसानियत नही ।
थूकता हूँ उन कैमरा उठाए खड़े लोगों पर।#MathuraCourt #AdvocateFight #ViralReels pic.twitter.com/X3s8NysCYP
हेही वाचा :
भारतातील अनोखं मंदिर ज्याचे खांब हवेत लटकतायेत; कुठे आहे हे मंदिर? जाणून घेऊया यामागचं रहस्य
फुफ्फस कमजोर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास शरीर होईल निकामी
लॉर्ड्सवर मोहीम फत्ते करण्याची संधी; भारतीय महिलांचा आज इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना