‘बीएसएनएल’ची ‘फोर-जी सेवा’ ऑगस्टमध्ये सुरू होणार

दूरसंचार क्षेत्रातील सरकारी मालकीची कंपनी भारत दूरसंचार निगम लि. अर्थात ‘बीएसएनएल’ (benefit)ऑगस्टपासून देशभरात फोर-जी सेवा सुरू करणार आहे. सरकारच्या ‘आत्मनिर्भर’ धोरणाच्या अनुषंगाने संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून ही फोर-जी सेवा सुरू करण्यात येणार आहे.

कंपनीने पंजाबमध्ये टीसीएस आणि सरकारी टेलिकॉम रिसर्च ऑर्गनायझेशन (benefit)‘सी-डीओटी’च्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियमद्वारे स्वदेशी विकसित तंत्रज्ञानाचा वापर करून फोर-जी सेवा सुरू केली असून, सुमारे आठ लाख सदस्य आहेत. या फोर-जी नेटवर्कवर प्रति सेकंद ४० ते ४५ मेगाबिट वेग नोंदवला गेला आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये स्थापित करण्यात आले होते. अशा जटिल तंत्रज्ञानाचे यश सिद्ध करण्यासाठी १२ महिने लागतात.

परंतु, ‘बीएसएनएल’चे नेटवर्क दहा महिन्यांच्या आत स्थिर झाले आहे. ‘बीएसएनएल’ ऑगस्टमध्ये देशभरात आत्मनिर्भर फोर-जी तंत्रज्ञान दाखल करेल, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने म्हटले आहे.कोर नेटवर्क हे नेटवर्क हार्डवेअर, उपकरणे आणि सॉफ्टवेअरचा संग्रह आहे जे दूरसंचार नेटवर्कमध्ये मूलभूत सेवा प्रदान करते.

टीसीएस, तेजस नेटवर्क्स आणि सरकारी मालकीच्या आयटीआय यांना ‘बीएसएनएल’कडून ‘फाइव्ह-जी’साठी पूरक फोर-जी नेटवर्क सक्षम करण्यासाठी सुमारे १९ हजार कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत.

‘बीएसएनएल’चे १.१२ लाख टॉवर

फोर-जी, फाइव्ह-जी नेटवर्कसाठी टॉवर उभारण्याची प्रक्रिया सुरू

देशभरात फोर-जी सेवेसाठी नऊ हजारांहून अधिक टॉवर स्थापन

त्यापैकी सहा हजारांहून अधिक टॉवर पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश पश्चिम व हरियाणा

हेही वाचा :

लोकसभा मतदारसंघ हादरला; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याची भोसकून हत्या

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा हाणामाऱ्यांनी गाजला! महाराष्ट्रात ३ ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये राडा

बोगस मतदान झाल्याच्या आरोपावरून कोल्हापूरातील मतदान केंद्रावर गोंधळ!