८००० रुपयांपासून घडवले कोटींचे साम्राज्य! “समस्या, समाधान आणि यश…”

८ हजार रुपयांतून व्यवसाय सुरू केलेल्या कृतिका कुमारन यांनी नैसर्गिक(business) सौंदर्यप्रसाधनांचा ब्रँड Vilvah तयार करून आज २९ कोटींचा टर्नओव्हर गाठला आहे.

कोयंबटूरच्या कृतिका कुमारन यांनी केवळ ८ ते १० हजार रुपयांपासून व्यवसाय सुरू करत कोट्यवधींचा टर्नओव्हर गाठला आहे. पूर्वी घर सांभाळणाऱ्या कृतिका आज एक यशस्वी उद्योजिका आहेत. (business) आपल्या मुलीच्या त्वचेच्या त्रासावर उपाय शोधताना त्यांनी नैसर्गिक घटकांचा वापर करून साबण तयार केला, आणि याच साध्या सुरुवातीने ‘Vilvah’ या ब्रँडचा जन्म झाला.

कृतिकाच्या मुलीला एक्झिमा नावाचा गंभीर त्वचेचा त्रास होता. केमिकलयुक्त उत्पादने निष्फळ ठरत होती. म्हणून कृतिकाने घरीच बकरीच्या दूधाचा वापर करून साबण बनवायला सुरुवात केली.(business) हे साबण मुलीला चांगले फायदेशीर ठरले. यामुळे तिने या नैसर्गिक साबणांची विविध रूपं तयार केली: चारकोल, गुलाब आणि क्लासिक बकरी दूध साबण. कृतिकाची ही प्रेरणा तिच्या आईकडून आली, ज्या स्वतःही अनेक वर्ष त्वचेच्या आजाराने त्रस्त होत्या.

२०१७ मध्ये कृतिकाने ‘Vilvah’ ब्रँडची सुरुवात आपल्या घरच्या स्वयंपाकघरातून केली. ‘Vilvah’ हे नाव ‘बिल्व’ पानावरून घेतले आहे, जे पवित्र मानले जाते. तिने फेसबुक, इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर उत्पादने प्रचारले आणि पहिल्याच काही महिन्यांत कोयंबटूर व तमिळनाडूच्या अनेक भागांतून ऑर्डर मिळू लागल्या.

सुरुवातीचा छोटा व्यवसाय जसजसा वाढला, तसतसे त्यांनी अमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका यासारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्री सुरू केली. केवळ पाच महिन्यांत तिने आपल्या घराशेजारी १,००० चौरस फूटांची उत्पादन युनिट उभी केली आणि त्यासाठी सुमारे १० लाख रुपये गुंतवले. २०२० मध्ये ‘Vilvah’ कंपनीला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून नोंदणी मिळाली. कृतिकाचे पती तमिळ कुमारन यांनीही व्यवसायात सहभाग घेतला. ते सध्या कंपनीचा वित्त विभाग आणि व्यवस्थापन सांभाळतात.

संघर्षातून यशाकडे झेप घेणारा एक प्रेरणादायी प्रवास! IPS अधिकारी प्रेमसुख डेलू…
पहिल्याच वर्षी १ कोटी रुपयांचा टर्नओव्हर मिळवणाऱ्या Vilvah ने २०२३ मध्ये तब्बल २९ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली. आज Vilvah कडे सुमारे ७० प्रकारचे स्किनकेअर व हेअरकेअर उत्पादने असून १०० हून अधिक लोकांना रोजगार दिला जातो. त्यांच्या विक्रीपैकी ५०% वेबसाईटवरून, २०% स्टोअरमधून आणि ३०% ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून होते. कृतिकाचे ध्येय हे ‘मिल्क रेंज’ उत्पादनांद्वारे बाजारात वेगळेपणा टिकवणे आहे. तिच्या दृढ इच्छाशक्तीने आणि चिकाटीने सिद्ध केले आहे की, अडचणीतूनही मोठे यश साध्य होऊ शकते.

हेही वाचा :

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मोदी सरकार 4% महागाई भत्ता वाढवणार

भारतीय महिला संघ तिसऱ्या T20 सामन्यात कोसळला! इंग्लडने 5 धावांनी मिळवला विजय

Khloe Kardashian ने केली Rhinoplasty शस्त्रक्रिया! जाणून घ्या राइनोप्लास्टी केल्यामुळे त्वचेला होणारे फायदे