नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून या मुद्द्यावरून आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय बदल सुरू करण्यात आले आहेत. (examination) काही अधिकाऱ्यांना पदावरून दूर केल्यानंतर आता विविध महत्त्वाच्या पदांसाठी नव्या भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.नीट पेपरफुटीच्या प्रकरणामुळे देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून जंतर-मंतर येथे CJP कडून आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. दुसरीकडे, परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार रोखण्यासाठी सरकार कठोर कायदा आणण्याच्या तयारीत असून त्यासाठी संसदेत विधेयक मांडण्याची तयारी सुरू आहे.

दरम्यान, पेपरफुटी प्रकरणात NTA मधील काही अधिकाऱ्यांवर आरोप झाल्यानंतर सरकारने कारवाई करत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना संस्थेबाहेरचा रस्ता दाखवला. या निर्णयानंतर रिक्त झालेल्या पदांसाठी NTA ने तातडीने भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. परीक्षा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ही भरती प्रक्रिया राबवली जात असल्याचे सांगितले जात आहे.शिक्षण मंत्रालया अंतर्गत कार्यरत असलेल्या स्वायत्त NTA ने चार जनरल मॅनेजर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. (examination) याशिवाय केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रतिभा सेतू पोर्टलच्या माध्यमातून 16 यंग प्रोफेशनल पदांसाठीही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अशा प्रकारे एकूण 20 पदांसाठी भरती केली जाणार आहे.
ही नियुक्ती प्रक्रिया प्रा. के. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीच्या शिफारशींनुसार राबवली जाणार आहे. चारही जनरल मॅनेजर पदांवर सुरुवातीला तीन वर्षांच्या कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यात येईल. नियुक्त अधिकारी प्रश्नसंच तयार करणे, मूल्यमापन पद्धती, नॉर्मलायझेशन, इक्वेटिंग आणि कॅलिब्रेशन यांसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवतील. (examination) तसेच देशातील 500 हून अधिक शहरांतील आणि निवडक आंतरराष्ट्रीय परीक्षा केंद्रांवरील परीक्षा व्यवस्थापनावर त्यांचे नियंत्रण असेल. 16 यंग प्रोफेशनल पदांपैकी 12 पदे शैक्षणिक संशोधनासाठी, 2 कायदेशीर संशोधनासाठी आणि 2 वित्त व लेखा विभागासाठी राखीव असून निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती 24 महिन्यांच्या कालावधीसाठी केली जाणार आहे.
हेही वाचा :
झिम्बाब्वेविरुद्धचा सामना कुठे पाहता येणार? योग्य माहिती जाणून घ्या?