बसने स्कूटीस्वार तरुणीला चिरडले; घटनास्थळीच मृत्यू; सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर

उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये सोमवारी एक अत्यंत वेदनादायक अपघात घडला.(scooter)या अपघातात एका स्कूटीस्वार तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिमला बायपास रोडवर झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, घटनास्थळी पोहोचलेल्या नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा अपघात एका प्रायव्हेट बसमुळे झाला असून बसने स्कूटीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे तरुणीचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना सोमवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडली. शिमला बायपास रस्त्यावर वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू होती. त्या वेळी स्कूटीवरून एक तरुणी जात होती. (scooter)पण मागून आलेल्या प्रायव्हेट बसने तिला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की ती थेट बसच्या चाकाखाली सापडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.अपघात घडल्यानंतर काही क्षणातच रस्त्यावर गर्दी जमू लागली. काही प्रत्यक्षदर्शींनी त्वरित पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. बस चालक तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र स्थानिक नागरिकांनी त्याला अडवून ठेवले.

काही वेळाने पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस घटनास्थळाची पाहणी करत असून सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहेत.(scooter)या घटनेचा व्हिडिओ सध्या वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र व्हायरल झालेल आहे. अपघात इकता भयंकर होता की प्रत्येकाने विविध प्रतिक्रिया मांडल्या आहेत. एका यूजरने म्हटलं,”तिची चुकी होती” दुसऱ्या यूजरने म्हटलं,”सर्व अचानक घडलं” अशा विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

हेही वाचा :

रक्षाबंधनाआधीच बहिणीचा अक्राळविक्राळ चेहरा, भावाचा गळा दाबून…

महाराष्ट्र मंत्रिमंडळात ‘वाईल्ड कार्ड’ एन्ट्रीची शक्यता! शिंदेंकडून ‘मास्टरस्ट्रोक’, अजित पवार गटाला धक्का?

जैन समाजाचे एकत्रित आवाहन – JIO चा बहिष्कार करून माधुरीसाठी न्याय मागा