हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व असते. या दिवशी (Hinduism)अनेक उपाय केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळविता येते. यावेळी आज 24 जुलै रोजी असणाऱ्या अमावस्येला कोणते उपाय करायचे जाणून घ्या

आषाढ महिन्यातील येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या किंवा दीप अमावस्या असे म्हटले जाते. त्याचसोबत या अमावस्येला हरियाली अमावस्या देखील म्हटले जाते. असे म्हटले जाते की, पूर्वजांना (Hinduism)पाणी अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. आज गुरुवार, 24 जुलै रोजी आषाढ अमावस्या आहे. पूर्वजांसाठी अमावस्या तिथी साजरी केली जाते.
प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्या तिथीला विशेष महत्त्व असते. (Hinduism)या महिन्यात येणारी अमावस्या पितृसाठी असल्याने यावेळी दान करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे भगवान शिवांचे आशीर्वाद देखील मिळतात आणि पितृदोषापासून मुक्तता देखील मिळते असे म्हटले जाते.
अमावस्या कधी सुरु होत आहे
बुधवार, 23 जुलै रोजी दुपारी 2.28 वाजता सुरु होत आहे आणि अमावस्येची समाप्ती गुरुवार, 24 जुलै रोजी दुपारी 12.40 वाजता होईल. या अमावस्या तिथीला पिठोरी किंवा दीप अमावस्या असे म्हटले जाते. या दिवशी दिवे लावण्याला देखील म्हटले जाते.
अमावस्येच्या दिवशी करा हे उपाय
शिवलिंगावर जलअभिषेक
अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्यावर शिवलिंगावर जलअभिषेक करावा. तसेच शिवलिंगावर शुभ्र वस्तू देखील अर्पण कराव्यात.
गरजू व्यक्तीला दान करणे
अमावस्येच्या दिवशी तांदूळ, साखर, पीठ, मीठ, दूध, दही या गोष्टींचे दान करणे शुभ असते. या गोष्टींचे दान ब्राम्हण किंवा गरजू व्यक्तीला करावे.
पितृदोषापासून मुक्ती
पितृदोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी अमावस्येच्या दिवशी छत्री, बूट, चप्पल, कपडे इत्यादी आवश्यक वस्तूंचे दान करा. त्यामुळे पितृदोषापासून मुक्तता होते अशी मान्यता आहे.
स्नान करणे
त्याचसोबत अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. जर गंगा किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणे शक्य नसल्यास शक्यतो आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करा.
देवी लक्ष्मीचे आगमन
असे म्हटले जाते की, या दिवशी रात्री ॐ अक्षर बनवून महालक्ष्मी यंत्र पूजेच्या ताटामध्ये ठेवून त्याची पूजा केल्यास घरामध्ये देवी लक्ष्मीचे आगमन होऊ शकते.
अमावस्येच्या दिवशी काय करावे
अमावस्येच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करु नये. मान्यतेनुसार, अमावस्येच्या दिवशी काळोख असलेल्या ठिकाणी जाऊ नये. तसेच वापरलेले कपडे, बूट किंवा इतर कोणत्याही वस्तू वापरु नये. तसेच या दिवशी कोणत्याही व्यक्तीशी वाद घालणे टाळावे. त्याचसोबत या दिवशी नखे कापणे देखील निषिद्ध मानले
हेही वाचा :
मेनोपॉजच्या काळातील त्रास
आज दत्तगुरूंच्या कृपेने राशी ठरणार भाग्यशाली! दीप अमावस्येचा शुभ संयोगही, आजचे राशीभविष्य वाचा
फक्त 180 मिनिटांत महाराष्ट्रातून गुजरातला पोहचणार ! भारतातील पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार? रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केली तारीख