फक्त 180 मिनिटांत महाराष्ट्रातून गुजरातला पोहचणार ! भारतातील पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार? रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केली तारीख

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर तयार करण्याचे काम(train line) वेगाने सुरू आहे. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून बुलेट ट्रेनच्या प्रोजेक्टचे काम केले जात आहे. 508 कि.मी. लांबीचा हा मुंबई ते अहमदाबाद असा बुलेट ट्रेनचा कॉरीडॉर आहे. त्यापैकी 2 किलोमीटरचा मार्ग जमिनीखालून जाणार आहे. हा बोगदा देशातील पहिलाच समुद्राखालून निघणारा बोगदा आहे. ही बुलेट ट्रेन फक्त 180 मिनिटांत महाराष्ट्रातून गुजरातला पोहचणार आहे. भारतातील पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार? रेल्वेमंत्र्यांनी तारीख जाहीर केली आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत बुलेट ट्रेनच्या प्रोजेक्टबाबात माहिती दिली. मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल (एमएएचएसआर) प्रकल्प एकूण 508 किमी लांबीचा आहे. जपान सरकारच्या आर्थिक आणि तांत्रिक मदतीने या प्रकल्पावर काम सुरू आहे.मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिकेवर एकूण 12 स्टेशन असणार आहेत. यामुळे मुंबईहून अहमदाबाद प्रवास फक्त 3 तासांत पूर्ण होणार आहे. 12 स्थानकांपैकी 4 स्थानके महाराष्ट्रात(train line) असणार आहेत. तर, 8 स्थानके गुजरातमध्ये असतील. यात मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सूरत, भरुच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती या स्थानकांचा समावेश आहे. ऑगस्ट 2026पासून बुलेट ट्रेनच्या चाचण्या सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी 559 कर्मचारी 24 तास काम करत आहेत.या प्रकल्पासाठी 24 पुल नदीवर बांधण्यात येणार आहेत. त्यातील 20 पूल गुजरातमध्ये आणि 4 पूल महाराष्ट्रात आहेत.

गुजरातमधील बापी आणि साबरमती दरम्यानच्या सेक्शनचे काम डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. संपूर्ण प्रकल्प डिसेंबर 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. बुलेट ट्रेन(train line) प्रकल्प हा एक अतिशय गुंतागुंतीचा प्रकल्प आहे, त्यामुळे त्याचे पूर्णत्व सिव्हिल वर्क, ट्रॅक, वीज, सिग्नल, टेलिकम्युनिकेशन आणि ट्रेन सेट उपलब्ध झाल्यानंतरच निश्चित करता येईल असे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले.

या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 1 लाख 8 हजार कोटी रुपये आहे. यातील 81 टक्के खर्च जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी करत आहे. हे सुमारे 88 हजार कोटी रुपयांच्या बरोबरीचे आहे. उर्वरित 19 टक्के किंवा 20 हजार कोटी रुपये रेल्वे मंत्रालय, गुजरात आणि महाराष्ट्र एकत्रितपणे करतील. यातील 50 टक्के निधी रेल्वे मंत्रालय आणि 25-25 टक्के निधी गुजरात आणि महाराष्ट्र देईल. या वर्षी ३० जूनपर्यंत या प्रकल्पावर सुमारे 78 हजार 839 कोटी रुपये खर्च झाले आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आवश्यक असलेली सर्व जमीन संपादित करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

कोल्हापूर: प्रेमाच्या त्रिकोणातून खून, अल्पवयीन संशयिताच्या दारात ४० -५० बायका गेल्या अन्

सांगलीत अल्पवयीन मुलीने आयुष्य संपवलं, गोपीचंद पडळकर, सुहास बाबर यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपकडून मत चोरी; काँग्रेस नेते राहुल गांधींचा पुन्हा गंभीर आरोप