खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPF हा भविष्यासाठी महत्त्वाचा आर्थिक आधार मानला जातो. दर महिन्याला कर्मचारी आणि कंपनीकडून ठराविक रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. या रकमेवर व्याजही मिळते. (account) त्यामुळे निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षिततेसाठी पीएफची मोठी मदत होते. मात्र, अचानक आर्थिक गरज निर्माण झाल्यास या पीएफ खात्यावर थेट कर्ज घेता येते का, असा प्रश्न अनेक कर्मचाऱ्यांना पडतो.

बँकेप्रमाणे EPFO कडून पीएफ खात्यावर वैयक्तिक कर्ज घेण्याची सुविधा सध्या उपलब्ध नाही. मात्र, काही विशिष्ट कारणांसाठी पीएफ खात्यातील रक्कम आगाऊ किंवा अंशतः काढण्याची सुविधा आहे. घरखरेदी, घरबांधणी, शिक्षण, वैद्यकीय उपचार अशा विविध कारणांसाठी पात्रतेनुसार पीएफमधून पैसे काढता येतात.(account) त्यामुळे गरजेच्या वेळी कर्मचाऱ्यांना आपल्या पीएफ बचतीचा उपयोग करता येतो.
दरम्यान, EPFO 3.0 अंतर्गत पीएफ व्यवस्थेत मोठे बदल करण्याची तयारी सुरू आहे. पीएफशी संबंधित व्यवहार अधिक सोपे आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने विविध सुविधा आणल्या जात आहेत. यामध्ये ATM कार्डच्या माध्यमातून पीएफमधील ठराविक रक्कम काढण्याची सुविधा तसेच UPI शी जोडणी करण्याच्या प्रस्तावाचाही समावेश आहे. या सुविधा सुरू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना गरजेच्या वेळी पीएफच्या पैशांपर्यंत अधिक सहजपणे पोहोचता येण्याची शक्यता आहे.
याशिवाय जुन्या किंवा निष्क्रिय पीएफ खात्यांमध्ये अडकलेली रक्कम शोधण्यासाठी ‘EPF Aadhaar-Based Access Portal for Tracking Inoperative Accounts’ म्हणजेच ई-प्राप्ती सुविधेचाही उपयोग होऊ शकतो. जुने पीएफ खाते सध्याच्या UAN क्रमांकाशी लिंक नसल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना आपली जुनी बचत शोधण्यासाठी या सुविधेची मदत मिळू शकते. निष्क्रिय पीएफ खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम पडून असल्याने ती योग्य खातेदारांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने अशा सुविधांना महत्त्व आहे. (account) त्यामुळे आगामी काळात EPFO च्या डिजिटल सुविधांमुळे पीएफ खाते पारंपरिक बचत खात्यापेक्षा अधिक सुलभ आणि तंत्रज्ञानाधारित होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांनो, ₹२००० खात्यात जमा झाले नाही? इथं करा तक्रार, २४ वा हप्ता होईल लगेच जमा?
हाती पैसा येणार, रखडलेली कामं मार्गी लागणार ५ राशींना मिळणार?