कॅन्सरने घेतला ‘या’ ३७ वर्षीय प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचा जीव

टीव्ही इंडस्ट्रीशी संबंधित एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे, ज्यामुळे इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. ‘निशा अँड उसके कजिन्स’ फेम अभिनेता(actor) वैभव कुमार सिंग राघवे उर्फ ​​विभू राघवे यांचे निधन झाले आहे. हा अभिनेता बऱ्याच काळापासून चौथ्या टप्प्यातील कोलन कर्करोगाशी झुंज देत होता.

अखेर तो कर्करोगाशी लढा देऊन वयाच्या ३७ वर्षी या जगाचा निरोप घेतला आहे. ‘बिग बॉस १८’ चा विजेता करणवीर मेहरा आणि अभिनेत्री कावेरी प्रियम यांनी त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. यासोबतच त्यांनी विभू राघवे(actor) यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

विभू राघवे हा एक अभिनेता आहे त्याने ‘निशा अँड उसके कजिन्स’ या शो मध्ये काम करून चाहत्यांची मने जिंकली. या मालिकेमधील त्याची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. तसेच, अभिनेता ‘सावधान इंडिया’ आणि ‘सुवरिन गुग्गल’ सारख्या शोमध्ये देखील दिसला आहे.

२०२२ मध्ये अभिनेत्याला(actor) त्याच्या गंभीर आजाराबद्दल कळले की ते कोलनच्या न्यूरोएंडोक्राइन कर्करोगाने ग्रस्त आहेत. उपचारादरम्यान, विभू राघव यांनी रुग्णालयातून स्वतःचा एक फोटो शेअर केला, जो पाहून त्यांचे चाहते आश्चर्यचकित झाले. आणि अभिनेत्याबद्दल चिंता व्यक्त करू लागले.

 (फोटो सौजन्य - Instagram)

दुसरीकडे, विभू राघवे यांच्या निधनाने त्यांच्या जवळच्या मित्रांना आणि टीव्ही स्टार्सना मोठा धक्का बसला आहे. बिग बॉस १८ चा विजेता आणि अभिनेता करणवीर मेहरा यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. करणने त्यांच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले, “खूप लवकर. तुमच्या आत्म्याला शांती मिळो.” त्यांच्याशिवाय अभिनेत्री प्रियम कावेरी आणि सिंपल कौल यांनीही विभू राघवे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

कर्करोगाशी झुंजणाऱ्या विभू राघवेची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यांच्याकडे कर्करोगावर उपचार करण्यासाठीही पैसे नव्हते. यानंतर, सिम्पल कौल, मोहसिन खान, सौम्या टंडन आणि अदिती मलिक यांच्यासह अनेक स्टार्सनी विभू राघवेच्या उपचाराचा खर्च उचलण्यासाठी क्राउडफंडिंगचे आवाहन केले होते. अभिनेता मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार घेत होता.

हेही वाचा :