खुलासा झाला! IPL 2025 Final आधी AI ने सांगितले कोण जिंकणार? या संघाचे चाहते खुश

पंजाब किंग्स विरुद्ध राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामध्ये आज महाअंतिम सामना(IPL ) खेळवला जाणार आहे. या सामन्यात कोण विजयी होणार यासाठी आता चाहत्यांना फक्त काही तास प्रतिक्षा करावी लागणार आहे. पंजाबच्या संघाला क्वालिफायर १ मध्ये बंगळुरुच्या संघाने पराभुत करुन फायनलमध्ये स्थान पक्के केले आहे. त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये पंजाबच्या संघाला बदला घेण्याची सुवर्णसंधी आहे. या विजेतेपदाच्या लढतीपूर्वी, क्रिकेट तज्ज्ञांसह, आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) प्लॅटफॉर्मवर विजेत्या संघाचे भाकित सुरू झाले आहेत.

सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात आयपीएल(IPL ) २०२५ विजेता कोण होणार यावर तर्क वितर्क लावले जात आहेत. एवढेच नव्हे तर चाहते एआय प्लॅटफॉर्मवर शोधत आहेत की यावेळी आयपीएल २०२५ चा विजेता कोण असेल? डेटा, अल्गोरिदम आणि मशीन लर्निंगच्या आधारे, एआयने आयपीएलच्या या हंगामाच्या विजेत्याचा अंदाज वर्तवला आहे.

एआयचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत यामध्ये चॅटजीपीटी, ग्रोक आणि गुगल जेमिनी या सर्वांचे आयपीएल (IPL )विजेता कोण होणार याचे उत्तर सारखेच दिले आहे. या प्लॅटफॉर्मनुसार, आरसीबीला आयपीएल २०२५ चा अंतिम सामना जिंकण्याची उच्च शक्यता आहे. काही एआय प्लॅटफॉर्म पंजाब किंग्जला कमी लेखत नाहीत, परंतु आरसीबीला थोडीशी आघाडी आहे.

विशेषतः क्वालिफायर-१ मध्ये पंजाब किंग्जचा ८ गडी राखून पराभव करून त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याच वेळी, हंगामात ६०० पेक्षा जास्त धावा करणारा विराट कोहली, उत्तम सुरुवात करणारा फिल साल्ट आणि रजत पाटीदार हे कर्णधारपद आणि फलंदाजी दोन्हीमध्ये महत्त्वाचे योगदान देत आहेत.

एक्स ग्रोकच्या मते, अंतिम फेरीत आरसीबीचा वरचष्मा दिसत आहे. जोश हेझलवूड ११ सामन्यात २१ बळी आणि सुयश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आरसीबीची गोलंदाजी खूपच मजबूत आहे. विराट कोहली देखील सध्या कमालीचा फार्ममध्ये पाहायला मिळाला आहे.

गुगल जेमिनीने अंतिम सामन्याबद्दल सांगितले की, आयपीएल ट्रॉफी पहिल्यांदाच जिंकण्यासाठी दोन्ही संघांमध्ये जोरदार लढत होईल. क्वालिफायर सामन्यात कामगिरी पाहून आरसीबी संघाला आघाडी मिळू शकते. पंजाब संघानेही अद्भुत फलंदाजी दाखवली आहे आणि प्रत्येक संघाला आव्हान दिले आहे.

हेही वाचा :