चंद्रकांतदादांनी भर सभेत शिरोळमधील माधवराव घाटगेंना दिली आमदारकीची ऑफर, पण…

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील(political action committees) शिरोळमध्ये शुक्रवारी ( 20 एप्रिल ) भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती. या मेळाव्यात त्यांनी शिरोळ तालुक्यातील बहुजन विकास आघाडीचे नेते व गुरुदत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांना शिरोळ विधानसभा मतदारसंघांचे भावी आमदार होण्याची ऑफर देऊन खळबळ उडवून दिली.

“घाटगे यांची जनमानसात (political action committees)ओळख चांगली आहे. नेहमीच कोणत्या पदाची अपेक्षा न ठेवता हा माणूस इतरांसाठी धडपडतोय. शिरोळ मतदारसंघातून तुम्ही आमदार व्हा,” अशी ऑफरच चंद्रकात पाटील यांनी दिली.

“चंद्रकांत पाटलांच्या माध्यमातून शिरोळसाठी 77 कोटींचा आणि तालुक्याला महापुराचा फटका लक्षात घेता, पाणी मराठवाड्यात वळविण्यासाठी 3200 कोटींचा निधी मंजूर झाला,” असं माधवराव घाटगे यांनी सांगितलं. यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी तो संदर्भ घेऊन, “माधवराव, आता तुम्हीच आमदार व्हा,” अशी खुली ऑफर दिली.

त्यावर माधवराव घाटगे यांनी देखील तत्परतेने उत्तर देत चंद्रकांत पाटील यांच्या ऑफरला नकार दिला. “मला राजकारणात पडायचे नाही. माझा साखर उद्योग बरा आहे,” असे सांगत माधवराव घाटगे यांनी ऑफर धुडकावली.

शिरोळ मतदारसंघाचा आमदार करण्यात माधवराव घाटगेंची भूमिका मागच्या दोन निवडणुकीत निर्णायक राहिली आहे. शिरोळ मतदारसंघातून शिवसेनेचे ( शिंदे गट ) सहयोगी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर आमदार आहेत. पाटील-यड्रावकर आणि घाटगे यांच्यात विकासकामांचे उद्घाटन करण्यावरून मध्यंतरी संघर्ष झाला आहे. या लोकसभा निवडणुकीत पाटील-यड्रावकर नाराज दिसले. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार पाटील-यड्रावकर यांच्या घरी जाऊन त्यांना प्रचारासाठी सक्रिय केले आहे. असे असताना चंद्रकांत पाटील यांनी शिरोळ मध्ये येऊन ऑफर दिल्याने त्याची वेगळी चर्चा जिल्ह्यात आहे.

हेही वाचा :

मंडलिकांनी काढला जुना विषय; ‘त्यांचा’ पराभव करण्यासाठी माझ्यासोबत आले…

काँग्रेसचा शेवटचा प्रयत्नही असफल; ‘उत्तर मुंबई’च्या बदल्यात ‘सांगली’चा प्रस्तावही ठाकरेंनी फेटाळला

काँग्रेस पक्ष शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांना मानत नाही; मिलिंद देवरा यांचं टीकास्त्र