तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांची मोठी घोषणा महिलांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत मिळणार तामिळनाडूमध्ये महिलांना मोफत प्रवास करता येणार थलपती विजय यांच्या निर्णयाचे महिलांकडून स्वागत

तामिळनाडूमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री थलपती विजय नागरिकांच्या फायद्यासाठी एकापाठोपाठ एक मोठ्या घोषणा करत आहेत. त्यांनी आणखी एक मोठी घोषणा केली असून याचा फायदा राज्यातील महिलांना होणार आहे. राज्यातील महिलांना आता वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. मुख्यमंत्री थलपती विजय यांनी सोमवारी विधानसभेत ही मोठी घोषणा केली. (gas cylinders) त्याचसोबत त्यांनी महिलांना मोफेत बस प्रवासाबाबत देखील घोषणा केली. तामिळनाडूमधील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. मुख्यमंत्री थलपती विजय यांनी सोमवारी विधानसभेत अनेक नवीन कल्याणकारी योजनांची घोषणा केली. ‘अन्नपूर्णी सुपर सिक्स’ योजनेअंतर्गत थलपती विजय यांनी घोषणा केली की, ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी आहे त्यांना दरवर्षी ३ मोफत एलपीजी सिलिंडर मिळतील. ही योजना पुढील वर्षी जानेवारी महिन्यात पोंगलच्या मुहूर्तावर सुरू केली जाईल. या योजनेअंतर्गत सिलिंडर खरेदीवर खर्च केलेली रक्कम सरकार थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करेल.
‘अन्नपूर्णी सुपर सिक्स’ या योजनेमुळे अंदाजे १.३ कोटी कुटुंबांना फायदा होण्याचा अंदाज आहे. थलपती विजय सरकार या योजनेवर दरवर्षी अंदाजे ४,००० कोटी रुपये खर्च करणार आहे. मुख्यमंत्री विजय यांनी विधानसभेत सांगितले की, आखाती देशातील युद्धजन्य परिस्थिती आणि गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे लोकांवरील आर्थिक भार वाढला आहे. (gas cylinders) अशा परिस्थितीत सरकार हा दिलासादायक निर्णय घेऊन जनतेला दिलेले वचन पूर्ण करत आहे.थलपती विजय सरकारने महिलांसाठीच्या ‘वेट्री पयानम’ योजनेची देखील व्याप्ती वाढवली आहे. तामिळनाडूमधील महिलांना प्रवास मोफत करता येत आहे. आता फक्त सामान्य बसमधूनच नाही तर एक्स्प्रेस, एलएसएस, डिलक्स आणि आंतर जिल्हा सरकारी बसमधूनही महिलांना मोफत प्रवास करायची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे तृतीयपंथीयांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.
हेही वाचा :
केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची थलपती विजय यांनी घेतली भेट, केल्या या दोन मोठ्या मागण्या?
शिंदेंच्या या खासदाराला 100 टक्के मंत्रिपद मोंदीच्या मंत्रिमंडळात थेट विधानाने चर्चेला उधाण?
शरद पवारांबरोबरच्या बैठकीत काय घडलं पार्थ पवार काय म्हणाले अखेर बातमी आली समोर?