सांगली : ‘‘सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील(good leadership skills) बहुतांश नेत्यांनी आमचा घात केला. शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात काम केले. शिवसेना सांगलीत वाढू नये, यासाठी षङ्यंत्र रचून काम झाले. या संपूर्ण स्थितीचा फोटोसह अहवाल आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवणार आहोत,’’ अशी भूमिका जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी मांडली.
‘‘महाविकास आघाडी व शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या विरोधात काँग्रेसचे(good leadership skills) विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. काँग्रेसने या बंडाला बळ दिले, असा आरोप शिवसेना आधीपासून करत आली आहे. शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादीतील विविध नेते आणि गटांनी सेनेची साथ सोडली आणि वेगवेगळी भूमिका घेतली,’’ असा आरोपदेखील आता विभूते यांनी केला आहे.
विभूते म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीत एकदा शिवसेनेला जागा सुटली म्हटल्यानंतर सगळ्यांना एकत्र काम करायला हवे होते. तसे घडले नाही. बंडखोरी एकवेळ मान्य आहे, मात्र त्याविरोधात पक्षाने कारवाई केली नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस पक्ष विशाल पाटील यांच्या पाठीशी उभा राहिलेला दिसला. दुसरीकडे राष्ट्रवादीतील नेत्यांनी सोयीस्कर भूमिका घेतल्याचे आमच्या लक्षात आले आहे. रोहित पाटील यांनी तासगाव, कवठेमहांकाळमध्ये विशाल पाटील यांचे काम केले.
आमदार अरुण लाड समर्थकांपैकी थोड्यांनी भाजपचे तर थोड्यांनी अपक्षाचे काम केले. आमदार जयंत पाटील यांच्या समर्थकांपैकी ४० टक्के कार्यकर्ते विशाल यांच्यासोबत, ३० टक्के लोक भाजपसोबत, तर ३० टक्के शिवसेनेसोबत दिसले. त्याचे फोटो आम्ही मिळवले आहेत, व्हिडिओ आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवकांच्या भूमिका पुराव्यानिशी एकत्र केल्या आहेत. ’’
लोकसभेला शिवसेनेची कोंडी केली गेली, त्याचा बदला आम्ही विधानसभेला घेऊ, असा इशारा संजय विभूते यांनी दिला. ते म्हणाले, ‘‘विशाल पाटील यांच्या बंडाविरुद्ध काँग्रेसने कारवाई केली नाही. आम्ही विधानसभेला सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडी म्हणून काम करणार नाही. जागोजागी बंड करू. त्यावेळी शिवसैनिकांना ठाकरेंनी अभय द्यावे, अशी मागणी करू. सांगलीत शिवसेनेला एक जागा मिळेल, अन्य सात ठिकाणी आम्ही त्यांची तळी उचलणार नाही.’’
हेही वाचा :
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; ‘या’ चार जिल्ह्यांत फेरमतदान होणार
रोहितसोबत कोण करणार ओपनिंग? कशी असणार भारताची प्लेईंग 11?