सोशल मीडिया हादरवणारं ‘शेकी’ ‘या’ गाण्याची कॉपी? संजू राठोडवर गायकाचे गंभीर आरोप

मनोरंजन विश्वात कधी कोणती ठिणगी पडेल आणि त्याचे आगीत रूपांतर होईल, हे सांगता येत नाही.(media)अशीच एक मोठी वादळी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली, जेव्हा प्रसिद्ध गायक आलोक डीने थेट संगीतकार संजू राठोड याच्यावर गाणं चोरी केल्याचा गंभीर आरोप केला. आलोक डीच्या म्हणण्यानुसार, संजू राठोडने त्याचं गाजलेलं गाणं “शेकी” हुबेहूब कॉपी केलं आहे. या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.आलोक डी चे ‘पुरावे’ आणि संजू राठोडचे उत्तर!

आलोक डी केवळ आरोप करूनच थांबला नाही, तर त्याने हे आरोप सिद्ध करण्यासाठी सोशल मीडियावर काही एडिट केलेले व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओंमध्ये आलोक डीने त्याच्या गाण्याचे काही भाग आणि संजू राठोडच्या शेकी गाण्याचे संबंधित भाग एकत्र करून दाखवले आहेत.(media) या दोन्ही गाण्यांमधील समानता स्पष्टपणे दिसते, ज्यामुळे ऐकणाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. आलोक डीचा दावा आहे की, संजू राठोडने केवळ प्रेरणा घेतली नसून, थेट गाण्याची ‘कॉपी’ केली आहे, ज्यामुळे हे प्लेगिअरिजम म्हणजेच साहित्यिक चोरीचं प्रकरण बनलं आहे.

या गंभीर आरोपांवर संजू राठोडनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे, असं समजतं. मात्र, त्यांच्या प्रतिक्रियेचा नेमका तपशील अद्याप समोर आलेला नाही. संजू राठोड यांच्या बाजूने काय स्पष्टीकरण दिलं गेलंय, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.सोशल मीडियावर चर्चांना उधाण, प्रेक्षकांमध्ये मतभेद!आलोक डीने हे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यापासून या वादाने जोर पकडला आहे. नेटकऱ्यांमध्ये आणि संगीत रसिकांमध्ये यावर जोरदार चर्चा सुरू आहे. काहीजण आलोक डी च्या बाजूने उभे राहून संजू राठोडवर टीका करत आहेत, तर काहीजण संजू राठोडची बाजू घेत आहेत, की हा फक्त योगायोग असू शकतो किंवा संगीतात प्रेरणा घेणं सामान्य आहे.

मात्र, गाण्यांमधील समानतेमुळे अनेकजण संजू राठोड यांच्यावर थेट ‘कॉपी’चा आरोप करत आहेत.सध्याच्या डिजिटल युगात एखादं गाणं किंवा कलाकृती सहजपणे सर्वांपर्यंत पोहोचते,(media) पण त्याचबरोबर अशा साहित्यिक चोरीचे आरोपही तेवढ्याच वेगाने पसरतात. या घटनेमुळे पुन्हा एकदा संगीत क्षेत्रातील मूळ कलाकृतीचं संरक्षण आणि प्रेरणा व कॉपी यातील फरक यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली आहे

हेही वाचा :

इस्रायल/इराण युद्धात, आता अमेरिका उतरली

Rishabh Pant अडचणीत! पंचांशी वाद पडेल महागात, लागणार बॅन?

विजय देवरकोंडाच्या अडचणीत वाढ, SC/ST कायद्यांतर्गत गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?