25 एप्रिलपासून थिएटर्समध्ये प्रदर्शित झालेला ‘झापुक झुपूक’ सिनेमा(movie) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हलकाफुलक्या कथानकावर आधारित हा कौटुंबिक सिनेमा सध्या सोशल मीडियावर आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया यामधून चांगलाच गाजत आहे. जर तुम्ही अजूनही हा सिनेमा पाहिलेला नसेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

29 एप्रिल 2025 रोजी ‘झापुक झुपूक’ सिनेमा(movie) फक्त 99 रुपयांमध्ये पाहण्याची खास संधी मिळणार आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी असून, त्यामुळे प्रेक्षकांनी लवकरच थिएटरमध्ये जाऊन या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘झापुक झुपूक’ हा कौटुंबिक आणि मनोरंजक सिनेमा असून, सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे या कलाकारांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत.
चित्रपटातील गाणी सध्या म्युझिक चार्ट्सवर अव्वल स्थानी आहेत. ‘झापुक झुपूक’ शीर्षकगीत क्लब्स, पार्टीजमध्ये मोठ्या प्रमाणावर वाजवले जात आहे. ‘वाजीव दादा’ हे हळदी गीत आणि ‘प्रितीची घंटा’ हे प्रेमगीतही विशेष लोकप्रिय झाले आहे.

‘झापुक झुपूक’ सिनेमाने कथा, संवाद आणि विनोदी प्रसंग यामुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सोशल मीडियावर प्रेक्षकांनी सिनेमाचं कौतुक करत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित या चित्रपटाला विशेषतः तरुण वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे या खास ऑफरमुळे अजूनही सिनेमा न पाहिलेल्या प्रेक्षकांना उत्कृष्ट मनोरंजनाचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.
29 एप्रिल 2025 रोजी सर्व प्रमुख थिएटरमध्ये फक्त 99 रुपयांमध्ये ‘झापुक झुपूक’ पाहता येणार आहे. ही संधी मर्यादित असल्याने प्रेक्षकांनी लवकरच आपली तिकिटं बुक करावी. अशा प्रकारच्या ऑफर्समुळे प्रेक्षकांची थिएटरकडे ओढ वाढते आणि सिनेमा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतो.
हेही वाचा :
पहलगाम भ्याड हल्ल्यानंतर आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती समोर!
भर मैदानात विराट कोहली आणि केएल राहुल भिडले! वादावादीचा Video Viral
केंद्राचा मोठा दणका! भारताविरूद्ध विष ओकणाऱ्या 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवर बंदी