भर मैदानात विराट कोहली आणि केएल राहुल भिडले! वादावादीचा Video Viral

रविवारी आयपीएल 2025 चा दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा(Virat Kohli) सामान रंगला. या सामन्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये भारताचे दोन स्टार फलंदाज क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांशी भिडताना दिसत आहेत.

सामन्यादरम्यान, विराट कोहली(Virat Kohli) आणि केएल राहुल यांच्यात मैदानावर जोरदार वाद झाला. हा वाद दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू च्या डावात विराट कोहली फलंदाजी करत असताना आणि केएल राहुल विकेटकीपिंग करत असताना कुलदीप यादवच्या षटकात ही घटना घडली.

या सामन्यात आरसीबीला 163 धावांचे लक्ष्य मिळाले होते. हे टार्गेट चेस करताना त्यांनी २६ धावांवर तीन विकेट्स गमावल्या. यानंतर, कोहलीला कृणाल पंड्याची साथ मिळाली आणि चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये सामना जबरदस्त भागीदारी दिसून आली. आरसीबीच्या डावात, कुलदीप यादव दिल्ली कॅपिटल्सकडून 8 वे षटक टाकण्यासाठी आला. त्यावेळी विराट कोहली स्ट्राईकवर होता. यावेळी विराटने बोललेल्या एका गोष्टीवरून तो केएल राहुलवर खूप रागावला आणि विकेटच्या मागे वाद घालताना दिसला. राहुलही हातांनी काहीतरी इशारा करत होता.

व्हायरल झालेल्या व्हिडीओ बघितल्यावर नक्की काय झाले हे लगेच स्पष्ट झाले नाही.दरम्यान भारताचे माजी फिरकी गोलंदाज पियुष चावला यांनी दोन्ही भारतीय संघातील खेळाडूंमध्ये हा जोरदार वाद का झाला हे स्पष्ट केले आहे. पियुष चावलाच्या मते, दिल्ली कॅपिटल्सने क्षेत्ररक्षण सेट करण्यासाठी बराच वेळ घेतल्याने विराट कोहली नाराज होता. याचविषयी त्याने केएल राहुलकडे याबद्दल तक्रार केली. त्याचवेळी, विराट कोहलीच्या बोलण्यावर केएल राहुल संतापला. व्हिडिओमध्ये दोघांमधील तणाव स्पष्टपणे दिसून येत होता. पण पुढे जास्त काही झाले नाही. दोघांनीही जास्त वाद न होता क्रिकेट खेळायला सुरुवात केली.

रविवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) दिल्ली कॅपिटल्स (डीसी) ला ९ चेंडू शिल्लक असताना ६ विकेट्सने पराभूत केले. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध कृणाल पंड्या आणि विराट कोहली यांनी शानदार फलंदाजी केली. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध कृणाल पंड्या आणि विराट कोहली यांनी शानदार फलंदाजी केली. दोन्ही फलंदाजांनी अर्धशतके झळकावली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ला विजय मिळवून दिला. या विजयासह, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचले.

आयपीएलमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक ५०+ धावांच्या डाव खेळण्याच्या बाबतीत, विराट कोहली आता दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध या बाबतीत अव्वल स्थानावर आला आहे. कोहलीने आतापर्यंत आयपीएलमध्ये दिल्लीविरुद्ध फलंदाजी करताना ११ वेळा ५०+ धावा केल्या आहेत.

हेही वाचा :

पराभुताच्या भूमिकेत आले होते बिलावलचे आजोबा

पहलगाम भ्याड हल्ल्यानंतर आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती समोर!

जेव्हढ तुमच्या देशाचं बजेट तेवढं भारताच्या लष्कराचं.. असदुद्दीन ओवैसींचा पाकिस्तानवर थेट वार