‘प्यार किया तो डरना क्या’ हा डायलॉग तुम्ही चित्रपटात नक्कीच ऐकला असेल. याचेच अनुकरण करत आजकाल अनेक प्रेमीयुगुल(couples) आजूबाजूचे भान हरपून नको ते करायला बघतात. प्रेम करणं ही चुकीची गोष्ट नाही मात्र ते व्यक्त करत असताना आजूबाजूच्या परिस्थितीचे भान असायला हवे.
बदलत्या काळात प्रेमाच्या व्याख्याही बदलल्या. आता लोक आपले प्रेम व्यक्त करायला घाबरत नाहीत आणि जगाचा विचार तर मुळीच करत नाही. मात्र असे करत असताना अनेकदा लोकांना आजूबाजूच्या परिस्थितीचे भान राहत नाही आणि सार्वजनिक ठिकाणी, गार्डनमध्ये, बसमध्ये तसेच रेल्वेमध्ये अथवा रेल्वव स्टेशनवरही आपल्या मर्यादा सोडून वागतात.
अशीच एक घटना नुकतीच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे ज्यात एक प्रेमीयुगुल(couples) रेल्वे स्थानकावर एकमेकांचे चुंबन घेताना दिसून आले. मुख्य म्हणजे, यात एक कपल नाही तर कपल्स असे करताना दिसून आले, त्यांच्या आजूबाजूने लोक जात होती मात्र एकमेकांना किस करण्यात हे कपल्स इतके मग्न होते की त्यांना आजुबाजुचेही भान राहीले नाही. चला व्हिडिओत नक्की काय घडले आणि व्हिडिओ कुठला आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
दिल्ली मेट्रोचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. यात कधी प्रवाशांची मारामारी दिसून येते तर कधी कपल्सचे अश्लील चाळे… आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात काही कपल्स(couples) रेल्वे स्थनाकावर आपले भान हरपून सर्वांसमोर किस करताना दिसून आले.
व्हिडिओमध्ये एक कपल एकमेकांचे चुंबन घेताना दिसून येत आहे. यानंतर पुढच्याच क्षणी कॅमेरा रेल्वे स्थानकाच्या दुसऱ्या बाजूला येतो आणि तिथेही एक कपल किस करताना आढळून येतात. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या आजूबाजूने इतर प्रवासी जात असतात, काही त्यांना हे करताना पाहतातही मात्र ते थांबत नाहीत जे पाहून इतर लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊ लागतात.
View this post on Instagram
हा व्हायरल व्हिडिओ @devil_memes24 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘दिल्ली मेट्रोमध्ये स्वागत आहे’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून हजारो लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “कबीर सिंग कडून प्रेरित” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अशा लोकांमुळेच दिल्ली खराब झाली आहे”.
हेही वाचा :