हात पाय तोडून शरीरापासून वेगळे केलं अन्…, भावकीच्या वादातून चुलत भावांनी पाडला रक्ताचा सडा

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बिरोबावाडी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या परिसरात तीन चुलत भावांनी एका तरुणाची निर्घृण हत्या(crime) केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी तरुणाचे थेट हात पाय तोडले आणि दोन्ही अवयव धडापासून वेगळे केले आहे. हा प्रकार दौंड तालुक्यातून समोर आला असून या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी दोन आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील बिरोबावाडी भागात ही घटना घडली. येथे शेतीच्या बांधावरील वादातून चुलत भावांनीच आपल्या भावाची निर्घृणपणे हात पाय तोडून शरीरापासून वेगळे केले आहेत. कैलाश हागारे असं या गंभीर जखमी झालेल्या शेतकरी तरुणाचा नाव आहे. हल्ल्याची हीच घटना समोर येताच त्यांना तातडीने उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून जखमी कैलास यांचे चुलत भावांसोबत शेतातील बांधावरून वाद सुरु होता . हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी कैलासावर जीवघेणा हल्ला केला. आरोपींनी राक्षसी पद्धतीने फावडे आणि खोऱ्याच्या सहाह्याने कैलासवर हल्ला केला. आरोपींने हात आणि पाय शरीरापासून वेगळे केले. त्यानंतर आरोपींनी जखमी अवस्थेत कैलासला शेतात टाकून पळ काढला.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून गुन्हा नोंदवला. सोमनाथ हगारे, प्रवीण हगारे, गणेश हगारे आणि इतर तिघांविरुद्ध हत्येच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. ते इतर आरोपींची चौकशी करत आहेत. अशा भावनिक आक्रोशामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा :

जब्बार पटेल यांनी केले आजच्या “व्यवस्थे” वर प्रहार

ट्रंपच्या T1 स्मार्टफोनने लोकांना दिला धोका? चक्क लाँचिंगनंतर

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतून जेठालाल बबिताची एक्झिट?