क्रूरतेची मर्यादा ओलांडली! आधी बेदम मारहाण अन् नंतर मृतदेहावर नाचले लोक VIDEO VIRAL

सध्या बांगलादेशात मोठा राजकीय गोंधळ सुरु आहे.(danced) शिवाय बांगलादेशात हिंदू समुदायाविरोधात हिंसाचाराच्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे. नुकतेच ढाकामध्ये एक धक्कादायक आणि क्रूरतेची मर्यादा ओलांडणारी घटना समोर आली आहे. या भयावह घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेने बांगलादेशात हिंदू समुदायात संतापाची लाट उसळली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशात कट्टरपंथींनी एक हिंदू व्यापाराची मारहाण करुन हत्या केली आहे. कट्टरपंथी एवढेच करुन थांबले नाहीत, तर त्यांनी क्रूरतेची मर्यादा ओलांडत त्या व्यक्तीच्या मृतदेहावर नाचले देखील आहे. या संतापजक कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी १० जुलै रोजी घडली आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेने बांगलादेशात हिंदू समुदायात संतापाची लाट उसळली आहे. ही घटना ढाकातील मिटफोर्ड हॉस्पिटलजवळ घडली. एका भंगार विक्रेत्याला हल्लेखोरांनी बेदम मारहाण केली आणि नंतर तो मेल्याचे समजताच त्याच्या मृतदेहावहर उड्या मारल्या.हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बांगलादेशचे गृह व्यवहार सल्ला लेफ्टनंट जनरल निवृत्त जहांगीर आलम चौधरी यांनी या घटनेची माहिती दिली. (danced)त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढाका पोलिसांनी हिंदू व्यापाऱ्याच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या सात जणांना अटक केली आहे. तसेच देशभरात भंगार व्यापाराच्या हत्येप्रकरणी देशभरातून हिंदू समुदायकडून निषेध केला जात आहे.

जहांगीर आलम चौधरी यांनी, राजधानी ढाक्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी देशभरात शोध मोहिम देखील सुरु केली आहे. निवडणूकीपूर्वी देशात शांतता निर्माण करण्याच्या उद्देशाने ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. (danced)चौधरी यांनी, मिटफोर्डमधील हिंदू व्यापाऱ्याची ही हत्या अत्यंत दु:खद आणि क्रूर असल्याचे म्हटले आहे. तसेच संबंध गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, त्यांना कठोर शिक्षा केली जाईल असले त्यांनी म्हटले आहे.ढाका पोलिस आयुक्त आणिु बांगलादेशची गुप्तचर संस्था आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे आलम यांनी सांगितले. त्यांनी असेही म्हटले की, गुन्हेगार हा गुन्हेगार असतो असे सरकारचे स्पष्ट मत आहे. यामुळे त्याचा राजकीय संबंधांच्या आधारावरही सूट दिली जाणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

महापराक्रमाचा इतिहास आता जागतिक पटलावर

जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर भार, टॅक्स वाढवावा लागेल