पवार गटातील खदखद बाहेर भाकरी फिरवण्याची मागणी

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत अवघ्या दहा जागा जिंकणाऱ्या शरद पवार(politics) गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला असताना या पक्षातील कार्यकर्त्यांची आता खदखद बाहेर पडली आहे. जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करा अशी जोरदार मागणी करण्यात आली, त्यातून कार्यकर्ते आम्ही जयंत पाटील यांच्यात खडा जंगी झाली. आणि हे सर्व शरद पवार यांच्यासमोर घडले. मुंबईतील शरद पवार गट राष्ट्रवादी पक्षाच्या बैठकीमधील परिस्थिती हाताबाहेर जाताना पवार यांना ती व्यवस्थित हाताळता आली नाही. अशा प्रकारच्या पक्षीय बेदिलि अवस्थेला पवार यांना त्यांच्या राजकीय आयुष्यात प्रथमच सामोरे जावे लागले आहे.

शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसची(politics) गुरुवारी बैठक झाली. विधानसभा निवडणुकीत जो दारुण पराभव पत्करावा लागला त्याला केवळ आणि केवळ प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील हेच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप कार्यकर्त्यांनी केल्यानंतर बैठकीत एकदम गहजब निर्माण झाला. कार्यकर्ते आणि जयंत पाटील यांच्यात खडाजंगी झाली. प्रदेश अध्यक्ष पदावरून त्यांची हकालपट्टी करावी आणि मराठेतर व्यक्तीची अध्यक्षपदी नियुक्ती करावी अशी जोरदार मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली. बैठकीत चाललेला गोंधळ, केले जाणारे आरोप हे शांतपणे पाहण्याशिवाय पवार यांच्यासमोर पर्याय नव्हता.

इतर वेळी शरद पवार हे स्वतः भाकरी फिरवण्याची भाषा करत असत. तेव्हा त्यांच्या कृतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले जायचे. आता मात्र फासे उलटे पडले आहेत. कार्यकर्तेच भाकरी फिरण्याची भाषा करू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मोठ्या तयारीने उतरली होती. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला भरभरून यश मिळेल आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वाधिक सदस्य विधानसभेवर निवडून जातील असा एक अंदाज शरद पवार यांनी तेव्हा व्यक्त केला होता.

महाविकास आघाडीला बहुमत मिळाले की मुख्यमंत्रीपदावर आपण हक्क सांगायचा असे शरद पवार यांनी निश्चित केले होते. आणि त्यांच्यासमोर मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील यांचा चेहरा समोर होता. पाटील यांच्या मतदारसंघात भाषण करताना तेव्हा शरद पवार यांनी”या निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी जयंत पाटील यांना दिली जाईल.”असे सूचक वक्तव्य ही त्यांनी केले होते. प्रत्यक्षात या विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविजय मिळवला, त्यामुळे महाविकास आघाडीचा तसेच शरद पवार यांचा अपेक्षा भंग झाला होता.

शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ दहा जागा मिळाल्या याबद्दल शरद पवार यांच्याकडून आत्मचिंतन केले जात होते. याच काळात जयंत पाटील हे महायुतीमध्ये जाणार, त्यांच्यासाठी मंत्रीपदाची एक जागा रिक्त ठेवण्यात आली आहे. अशी चर्चा सुरू झाली होती. अजित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली तेव्हाही जयंत पाटील हे शरद पवार यांची साथ सोडणार अशी चर्चा झाली होती.

विशेष म्हणजे सुरू असलेल्या या राजकीय चर्चेचे जयंत पाटील यांनी कधीही खंडन केले नाही किंवा ज्या त्यावेळी खुलासा केला नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःच स्वतःभोवती संशयाचे धुके निर्माण केले होते. या सर्वांचा एकत्रित परिणाम मुंबईत झालेल्या बैठकीत दिसून आला. प्रदेश अध्यक्षाला कार्यकर्ते जाब विचारतात हे पहिल्यांदाच घडले आहे. याचा अर्थ शरद पवार यांची पक्षावरील पकड काहीशी ढिली होत आहे असा होतो.

गेल्या काही दिवसांपासून अजितदादा पवार आणि शरद पवार हे एकत्र येणार अशा चर्चेचा धुरळा उडाला होता. किंबहुना शरद पवार यांना एनडीए मध्ये सहभागी होण्यासाठी तयार करा असे अजितदादा पवार यांना भारतीय जनता पक्षाच्या गोटातून सांगण्यात आले होते. अगदी दोन दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांच्यावर शरद पवार गट फोडण्याच्या प्रयत्नाचा आरोप केला गेला आहे.

बाप आणि त्यांची लेक यांना वगळून इतर खासदारांनी अजित पवार(politics) गटात यावे यासाठी सुनील तटकरे हे प्रयत्नशील होते असे वृत्त गेल्या दोन दिवसापासून राजकीय वर्तुळात फिरत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे मुंबईत गुरुवारी बैठक झाली आणि त्यात कार्यकर्ते आणि जयंत पाटील यांच्यात घमासान होण्यामध्ये हे सुद्धा एक कारण त्यामागे होते. सुनील तटकरे यांच्यावर सुप्रिया सुळे या भयंकर संतापलेल्या होत्या आणि त्यांनी आपला संताप प्रफुल्ल पटेल यांना फोन करून व्यक्त केला.

एकूणच शरद पवार यांची राजकीय(politics) वाटचाल सध्या बिकट आहे. त्यांचा पक्ष जो काही उरला सुरला आहे तो अडचणीत आला आहे. पक्ष मजबूत होता, किंगमेकर च्या भूमिकेत होता तेव्हा शरद पवार हे आता भाकरी फिरण्याची वेळ आली आहे असे जाहीरपणे सांगत स्वतःकडे महाराष्ट्राच्या नजरा वळवून घ्यायचे.

आता ते कोणता निर्णय घेतात याबद्दल राजकीय वर्तुळात प्रचंड प्रमाणावर औत्सुक्य निर्माण व्हायचे. पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये अजितदादा पवार यांच्या गटामध्ये विलीन होणार नाही, जातीयवादी पक्षांच्या सोबत मी जाणार नाही असा खुलासा शरद पवार यांनी केला असून कार्यकर्त्यांचा सन्मान राखणाऱ्या शरद पवार यांच्याकडून जयंत पाटील बदलले जाईल का?

हेही वाचा :

करण जोहर-सिद्धार्थ मल्होत्राचा मुंबईत रॅम्पवॉकवर जलवा

अभिजित पटवा यांची लोक आंदोलन न्यास, राळेगणसिद्धीच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड

मकर संक्रांतीच्या आधी सूर्यदेव चमकवणार ‘या’ राशींचे नशीब; धनाचा होणार वर्षाव