आमदार बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत जाऊन देशाचं नेतृत्व करावं, तर महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदेंना मिळावं अशी भूमिका मांडली. यासोबतच त्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावरही जोरदार पलटवार केला.

राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. केंद्रात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी संभाव्य पावले उचलली जात असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मोठे मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. (Delhi) अश्यातच, शिवसेना (शिंदे गट) समर्थक आमदार बच्चू कडू यांनी याबाबत भूमिका मांडताना मोठं विधान केलं आहे. नागपुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन देशाचं नेतृत्व करावं आणि त्यांच्या अनुपस्थितीत महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवावं, अशी मागणी केली.
बच्चू कडू म्हणाले की, “महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला राज्यातील नेता देशाचं नेतृत्व करताना पाहायचा आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळेच महाराष्ट्रात भाजप पुन्हा सत्तेत आली. (Delhi) त्यामुळे केवळ संख्याबळ नव्हे तर नैतिकतेच्या आधारावर फडणवीस दिल्लीला गेल्यास मुख्यमंत्रीपद शिंदेंनाच मिळायला हवे.” ‘देशात देवा भाऊ, महाराष्ट्रात शिंदे साहेब’ बच्चू कडू म्हणाले, “देवा भाऊंनी निश्चितच दिल्लीची तयारी करावी आणि देशाची सूत्रे हाती घ्यावीत. महाराष्ट्रात शिंदे साहेबांनी नेतृत्व करावं. देशात देवा भाऊ आणि महाराष्ट्रात शिंदे साहेब असा प्रवास झाला पाहिजे.”
‘आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी’; पक्षांतराच्या अफवांवर सुप्रिया सुळे संतापल्या संजय राऊतांवर निशाणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस केंद्रात गेल्यास चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, असे वक्तव्य केले होते. यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले की, “संजय राऊत यांची भविष्यवाणी कधीच खरी ठरलेली नाही. त्यांनी कोणत्या ज्योतिषाकडे हात दाखवला आणि तो ज्योतिष कोणत्या पक्षाचा आहे, हे तपासायला हवं.”बोगस बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणी यावेळी बच्चू कडू यांनी बोगस बियाण्यांच्या मुद्द्यावरही सरकारने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. (Delhi) अशा कंपन्यांच्या मालकांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी, कारण एका हंगामाचे नुकसान म्हणजे शेतकऱ्याच्या वर्षभराच्या उत्पन्नावर परिणाम होतो, असे ते म्हणाले.
हेही वाचा :
बच्चू कडू आक्रमक मंत्र्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव केला सादर?