भारतातील ‘या’ ठिकाणी दरवर्षी सापडतात हिरे, अनेकजण रातोरात बनतात मालामाल

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमधील वैराकरूर आणि कुरनूल गावांच्या शेतात लोक हिरे शोधण्यासाठी दूरदूरून येतात. येथे बऱ्याच लोकांना हिरे(Diamonds) मिळाले असून यामुळे त्यांचे जीवन बदलले आहे.एखादा व्यक्ती रातोरात श्रीमंत झाल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. आतापर्यंत अनेकांना खोदकाम करताना हिरे सापडले असून त्यांचे नशीब उजळल्याचे समोर आले आहे. आंध्र प्रदेशातील अनंतपूरमधील वैराकरूर आणि कुरनूल गावांच्या शेतात लोक हिरे शोधण्यासाठी दूरदूरून येतात. येथे बऱ्याच लोकांना हिरे मिळाले असून यामुळे त्यांचे जीवन बदलले आहे. कधी 1-2 लाखांचे तर कधी 50 लाख रुपयांपर्यंतचे हिरे सापडल्याचे समोर आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पावसाळा सुरू होताच अनेक लोक आंध्र प्रदेशातील वैराकरूर, जोन्नागिरी, तुग्गली आणि मद्दीकेरा येथे पोहोचतात. पहिल्या पावसानंतर मातीचा वरचा थर वाहून जातो आणि त्यानंतर हिरे उघडे पडतात. तेलंगणा आणि कर्नाटकातूनही लोक या जिल्ह्यांमध्ये येतात. बरेच लोक वेगवेगळ्या प्रकारची अवजारेही सोबत आणतात आणि आपले नशीब आजमावतात.

नवभारत टाईम्सने च्या वृत्तानुसार, दरवर्षी पावसाळ्यात मद्दीकेरा आणि तुग्गली येथे 5 कोटींचे हिरे (Diamonds)सापडले होते. हे हिरे मुंबई किंवा सुरत येथे विकले जातात. याला चांगली किंमत मिळते. यामुळे अनेकजण मालामाल बनले आहेत. याच कारणामुळे बरेच लोक संपूर्ण पावसाळ्यात याठिकाणी कुटुंबासह रहायला येतात. काही लोक मंदिरांमध्ये राहतात, तर काही लोक झाडांखाली तंबू ठोकून हिरे शोधण्याचे काम करतात.

येथे एकदा किंवा दोनदा नव्हे तर बऱ्याचदा हिरे सापडले आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात मद्दीकेरा आणि तुग्गली येथे चार हिरे सापडले होते. या हिऱ्यांची किंमत तब्बल 70 लाख रुपये होती. यानंतर जूनमध्ये एका महिलेला एक हिरा सापडला होता, ज्याची किंमत 10 लाख रुपये होती. अनेजण या हिऱ्यांमुळे मालामाल बनले आहेत.

आंध्र प्रदेशातील या भागाला अनेक संस्थांनी हिऱ्यांचे आकर्षण केंद्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. खास बाब म्हणजे येथे हिरे शोधण्यासाठी खोदकाम करावे लागत नाही. पाऊस पडल्यानंतर जमिनीचा वरचा थर वाहून जातो आणि नंतर लोकांना लहान दगडांसारखे हिरे सापडतात. त्यामुळे बहुतेक लोक हिरे शोधण्यासाठी चाळणीचाही वापर करतात.

या भागात केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की अनंतपूर ठिकाणी 45 पेक्षा जास्त किम्बरलाइट पाईप्स (ज्वालामुखीमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर नैसर्गिकरित्या तयार झालेले खड्डे) आहेत. हे पाईपच्या माध्यमातून जमिनीच्या आतून हिरे वर येतात, आणि पावसानंतर जेव्हा पहिला थर वाहून जातो, त्यामुळे हिरे शोधण्यासाठी लोकांची गर्दी जमते. मात्र हे काम फक्त काही आढवडेच चालते. या काळात अनेकजण मालामाल बनतात.

हेही वाचा :

राज्यासाठी मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वपूर्ण निर्णय, वाचा सविस्तर
राजकारणातील अनुभवी व्यक्तिमत्त्व हरपले; माजी राज्यपाल काळाच्या पडद्याआड!
इशा मालवीया आणि अभिषेक कुमार पुन्हा एकत्र! ‘नी तू बार-बार’ गाण्याला जबरदस्त प्रतिसाद