भारतीय हवामान विभाग (IMD) च्या मुंबई हवामान विभागाच्या माहितीनुसार, २० मे रोजी मुंबईत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, तसेच वादळासह मध्यम ते मुसळधार पाऊस(Heavy rain) पडण्याची शक्यता आहे. सकाळी तापमान २६ अंश सेल्सिअस ते दिवसा ३३ अंश सेल्सिअस राहील.

भारतीय हवामान विभाग (IMD) च्या मुंबई हवामान अपडेटनुसार, मुंबई उपनगरातील सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २६.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तसेच कुलाबा येथील शहर वेधशाळेत कमाल तापमान ३३.४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २८.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी आयमडीकडून पुढील पाच दिवसांसाठी’ऑरेज’ अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि धुळे जिल्ह्यांसाठी पाच दिवसांसाठी यलो इशारा, ज्याचा अर्थ “सतर्क रहा किंवा सावधगिरी बाळगा” असा आहे, तर इतर जिल्ह्यांसाठी हाच इशारा एक दिवस ते चार दिवसांच्या कालावधीसाठी वैध आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी, कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्हे आणि घाट विभागांसह, भारतीय हवामान खात्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. पुणे जिल्ह्यातील घाट भागात, पाचही दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट लागू आहे, तर पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसाठी, अलर्टचा कालावधी एक ते चार दिवसांपर्यंत आहे.
ऑरेंज अलर्ट अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये आणि घाट विभागांमध्ये, “मुसळधार ते अतिमुसळधार(Heavy rain) पाऊस, विजांसह गडगडाटी वादळे आणि काही ठिकाणी ५०-६० किमी प्रतितास वेगाने वारे” असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पूर्व मान्सून पाऊस पडत आहे.

पुण्यातून मोठी बातमी समोर आलीय. पुण्यात आणखी एक होर्डिंग कोसळल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील मंतरवाडी येथे होर्डिंग कोसळल्याचं समोर आलं आहे. काही वेळापूर्वी पुण्यातील सणसवाडी मध्ये होर्डिंग कोसळल्याची घडली होती घटना, त्यानंतर आता फुरसुंगीतील मंतरवाडी चौकातही पावसामुळे फ्लेक्स कोसळलं आहे.
सोलापूरात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह सुरूय पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. हवामान विभागाने सोलापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मान्सूनपूर्व कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मिळाला दिलासा. मात्र या मान्सूनपूर्व पावसामुळे बागायतदार शेतकऱ्यांच्या चिंतेत पडली भर पडली आहे.
रत्नागिरीत आज (20 मे) सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर अवकाळी पावसाचे ढग जमा झाल्यानंतर विजांच्या कडकडाटात ढगांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली. समुद्रातील चक्रीय वातावरणामुळे कोकणात अवकाळी पाऊस पडत असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. समुद्र किनारपट्टी भागामध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत.
जिल्ह्यामधील ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये जोरदार अवकाळी पावसाने(Heavy rain) हजेरी लावली. पावसाच्या जोरदार सरींमुळे वाहनांची वाहतूक गती मंदावल्याचे चित्र देखील दिसून आले. ढगांचा गडगडात व विजांच्या कडकडाटामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांनी व ग्रामीण भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे सुरक्षितता बाळगण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.
हेही वाचा :
शिंदे गटाच्या बड्या नेत्याच्या गाडीवर गोळीबार…
पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही!
एसटीचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात, भरधाव बसने चौघांना उडवले; 2 ठार 2 गंभीर जखमी