UPI पेमेंट करणाऱ्यांची होणार मजा, 100 रुपयांच्या वस्तू फक्त 98 रुपयांमध्ये

देशात डिजिटल पेमेंटला(UPI payment) प्रोत्साहन देण्यासाठी सरकार एक नवीन योजना लागू करण्यचा विचार करत आहे. देशात जर ही नवीन योजना लागू झाली तर यूपीआयने पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मिंटच्या अहवालानुसार, ही योजना देशात लागू करण्यात आली तर यूपीआयद्वारे पेमेंट करणे क्रेडिट कार्डपेक्षा स्वस्त आणि फायदेशीर होणार आहे.

माहितीनुसार, ही योजना लागू करण्यासाठी ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे अधिकारी एक बैठक घेणार आहे. या योजनेअंतर्गत सरकार यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्यांना काही सवलत देण्याचा विचार करत आहे. जर तुम्ही वस्तू खरेदी केल्यानंतर त्याचा पेमेंट यूपीआयद्वारे केले तर तुम्हाला तीच वस्तू थोड्या कमी पैशात मिळणार आहे. याचा अर्थ तुम्हाला या वस्तू खरेदीवर डिस्काउंट मिळणार आहे.

जर तुम्ही क्रेडिट कार्डवर पेमेंट(UPI payment) केला तर दुकानदाराला 2% ते 3% MDR (व्यापारी सवलत दर) भरावा लागतो. एमडीआर एक प्रकारचा कर आहे. जो दुकानदाराला द्यावा लागतो. जर तुम्ही 100 रुपयांची वस्तू खरेदी केली आणि पेमेंट कार्डने केला तर दुकानदाराला 2-3 रुपयांचे नुकसान होते मात्र यूपीआयवर एमडीआर नसल्याने दुकानदाराला पूर्ण 100 रुपये मिळतात.

त्यामुळे आता सरकारकडून ही योजना यूपीआयवर देखील लागू करण्याचा विचार करण्यात येत आहे. ही योजना लागू झाल्यानंतर 100 रुपयांच्या वस्तूसाठी तुम्ही यूपीआयद्वारे पेमेंट केला तर तुम्हा फक्त 98 किंवा 99 रुपये खर्च येणार.

सरकारने ही योजना लागू केली तर याचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे. योजना लागू झाल्यानंतर ग्राहकांना प्रत्येक खरेदीत बचत होणार आहे. यासाठी सरकार ई-कॉमर्स कंपन्या, बँकिंग संस्था आणि एनपीसीआय (नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) शी चर्चा असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

हेही वाचा :

शिंदे गटाच्या बड्या नेत्याच्या गाडीवर गोळीबार…

पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही!

एसटीचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात, भरधाव बसने चौघांना उडवले; 2 ठार 2 गंभीर जखमी