बहुप्रतिक्षित ‘वॉर २’ सिनेमाचा टीझर(Entertainment news) प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात ज्युनियर एनटीआर आणि हृतिक रोशन दिसणार आहेत. ज्युनियर एनटीआर खलनायकाची भूमिका साकारत आहे. महत्त्वाचं म्हणजे हा टीझर येताच हिट झाला आहे. चाहत्यांना हा टीझर खूप आवडला असून हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरणार आहे, असं म्हणत आहेत. या चित्रपटात आणखी एका व्यक्तीची खूप चर्चा होतेय ती म्हणजे अभिनेत्री कियारा अडवाणी. कियारा अडवाणीचा लूक व्हायरल झाला आहे.

टीझरमध्ये कियाराची फक्त एक झलक दिसली. पण फक्त एका नजरेने, कियाराने संपूर्ण लाइमलाइट चोरली आहे. या चित्रपटात कियाराचा अतिशय ग्लॅमरस(Entertainment news) लूक पाहायला मिळणार आहे. टीझरमध्ये ती बिकिनी बोल्ड लूकमध्ये दिसली. पहिल्यांदाच कियाराने बिकिनी शॉट्स दिले आहेत. तिने पॅरट ग्रीन रंगाच्या बिकिनीमध्ये हॉट लूक दिला. कियाराचे कुरळे केस या लूकमध्ये दिसत आहेत. कियाराने या लूकमध्ये अतिशय हलका मेकअप केला. कियाराचे फोटो सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहेत.
कियाराने इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत लिहिले – या चित्रपटात पहिल्यांदाच अनेक गोष्टी घडल्या आहेत. पहिला YRF चित्रपट. पहिला अॅक्शन चित्रपट. पहिल्यांदाच २ अद्भुत नायकांसोबत काम करत आहे. अयान मुखर्जीसोबत पहिल्यांदाच काम करत आहे आणि पहिल्यांदाच बिकिनी शूट करत आहे.

कियाराच्या या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. आपल्याला माहितच आहे कियारा लवकरच आई होणार आहे. काहींनी ती गरोदर असताना हा लूक व्हायरल झालल्यामुळे नकारात्मक कमेंट केली आहे. तर काही चाहते सिद्धार्थ मल्होत्राला कसं वाटत असेल. त्याच्या मनात ईर्षा निर्माण झाली असेल का?
चित्रपटाच्या टीझरमध्ये कियाराचा लूक पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले – बिकिनीमध्ये क्वीन. तर दुसऱ्या युझरनेने लिहिले की,- सुंदर, सुंदर. एका युझरने तर थेट सिद्धार्थ मल्होत्राला प्रश्न विचारला आहे. सिद्धार्थ मल्होत्राचे काय, त्याला हेवा वाटत असेल.

कियारा अडवाणी लवकरच आई होणार आहे. सध्या ती तिच्या गर्भधारणेचा आनंद घेत आहे. ती नुकतीच मेट गालालाही गेली होती. मेट गालामध्ये कियाराचा हा पहिलाच कार्यक्रम होता. तिने मेट गालामध्ये तिच्या बेबी बंपचे फोटो शेअर केले. ती काळ्या ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये दिसली. यादरम्यान कियाराचा पती सिद्धार्थ मल्होत्राही तिच्यासोबत होता.
हेही वाचा :
शिंदे गटाच्या बड्या नेत्याच्या गाडीवर गोळीबार…
पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही!
एसटीचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात, भरधाव बसने चौघांना उडवले; 2 ठार 2 गंभीर जखमी