काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रंप यांच्या ट्रंप ऑर्गनाइजेशनने एक नवीन T1 स्मार्टफोन लाँच केला होता. लाँच केल्यापासून आतापर्यंत हा स्मार्टफोन(smartphone) प्रचंड चर्चेत आहे. लाँचिंगवेळी स्मार्टफोनच्या मॅन्युफॅक्चरिंगबाबत आरोप प्रत्यारोप सुरु होते. मात्र आता स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबाबत आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.’

T1 स्मार्टफोन(smartphone) लाँच केला तेव्हा कंपनीने असं सांगितलं होतं की, हा स्मार्टफोन ‘मेड इन यूएसए’ आहे. मात्र त्यानंतर समोर आलेल्या माहितीमुळे सर्वच चकित झाले. याशिवाय स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबाबत देखील आता वाद सुरु झाला आहे. फोनच्या अधिकृत वेबसाईटवरून ‘मेड इन अमेरिका’ वाला टॅग आता हटवण्यात आला आहे.
आता स्मार्टफोनवर ‘मेड इन अमेरिका’ नाही तर एक नवीन स्लोगन पाहायला मिळत आहे. आता T1 स्मार्टफोन प्रीमियम परफॉर्मेंस, प्राउडली अमेरिकन या नव्या टॅगसह उपलब्ध झाला आहे. या नव्या टॅगलाईनमुळे आता असा अंदाज वर्तवला जात आहे की, फोन अमेरिकेत मॅन्युफॅक्चर करण्यात आलेला नाही.
हा स्मार्टफोन केवळ अमेरिकेत डिझाईन करण्यात आला असल्याचा अंदाज आता वर्तवला जात आहे. त्यामुळे आता अनेकांना धक्का बसला आहे. एवढंच नाही तर स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबाबत देखील वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. लाँचिंगपूर्वी स्मार्टफोनचे जे स्पेसिफिकेशन्स सांगण्यात आले होते, त्यामध्ये बदल करण्यात आला आहे.

सुरुवातीला कंपनीने असा दावा केला होता की, T1 फोनमध्ये 6.78 इंचचा AMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे. मात्र आता वेबसाईटला भेट दिल्यानंतर असं समजत आहे की, स्मार्टफोनच्या डिस्प्लेचा आकार कमी करून 6.25 इंच करण्यात आला आहे. म्हणजेच डिस्प्लेचा जो आकार आधी सांगण्यात आला होता, त्यामध्ये आता बदल करण्यात आला आहे.
याशिवाय स्मार्टफोनच्या(smartphone) रॅमबाबत असं सांगण्यात आलं होत की, या डिव्हाईसमध्ये 12GB रॅम असणार आहे. मात्र आता वेबसाईटवर रॅमबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. काही तज्ज्ञांनी असं देखील सांगितलं आहे की, स्मार्टफोनचे जे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ती डिझाईन आणि लाँच करण्यात आलेल्या प्रोडक्टच्या डिझाईनमध्ये काहीसा बदल पाहायला मिळत आहे.
हा स्मार्टफोन जेव्हा लाँच झाला तेव्हा एका तज्ज्ञाने सांगितलं होतं की, या स्मार्टफोनचे मॅन्युफॅक्चर अमेरिकेत करण्यात आलेले नाही. हा स्मार्टफोन चीनसारख्या कोणत्याही थर्ड पार्टी फॅक्ट्रीमध्ये तयार करण्यात आलं असण्याची शक्यता आहे. कारण स्मार्टफोनचे सर्व भाग एकाच देशात बनवणे जवळजवळ अशक्य आहे. पुरवठा साखळीत अनेक देशांचा वाटा आहे.
स्मार्टफोनवर केले जाणारे आरोप प्रत्यारोपांचा विचार करता आता असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, ट्रंप ऑर्गनाइजेशनने लोकांची फसवणूक केली आहे का? असं करण्यामागे नेमकं कारण काय आहे? सोशल मीडियावर याबाबत अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. शिवाय ग्राहक देखील असे अनेक प्रश्न विचारत आहेत.
हेही वाचा :
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतून जेठालाल बबिताची एक्झिट?
ट्रम्प यांची घोषणा; ‘लवकरच भारतासोबतही मोठा व्यापार करार’
ठाकरेंच्या आंदोलनात सहभागी होणार? शरद पवार म्हटले, कोणीही सांगेल तुम्ही सहभागी व्हा…