परभणी-संभाजीनगर दरम्यानचे अंतर कमी होणार; रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी 2179 कोटींची मंजूरी

मराठवाड्यात नवीन लोहमार्ग, दुहेरीकरण, विद्युतीकरणाच्या प्रतीक्षेत वर्षानुवर्षे निघून गेली.(electrification) अखेर छत्रपती संभाजीनगर अंकाई (मनमाड) या ९८ किमी मार्गाचे रेल्वेच्या दुहेरीकरणाचे काम मार्गी लागले.


संभाजीनगर-परभणी रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी २,१७९ कोटी

छत्रपती संभाजीनगर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या(electrification)छत्रपती संभाजीनगर ते परभणी या १७७ किमी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी २१७९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे लवकरच या दोन्ही शहरांमधून रेल्वेचा दुहेरी प्रवास होणार आहे. याआधी सदरील रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते.

परभणी ही संभाजीनगर येथून १७७.२९ किमी अंतरावर आहे.(electrification) या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण हा ब्राऊनफिल्ड विस्तारीत प्रकल्प आहे. विजयवाडा बल्हारशाह आणि सिकंदराबाद मुंबई कॉरिडोअरची गर्दी कमी करणे, मालवाहतूक, प्रवासी वाहतूकीसाठी आता ही डबल लाईन एक कार्यक्षम पर्याय राहणार आहे. कारण हा प्रकल्प सुरू करण्यामागील तोच मुख्य उद्देश आहे. हा रेल्वेमार्ग छत्रपती संभाजीनगर, जालना व परभणीत जातो. यासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियाही करण्यात आली आहे.

मराठवाड्यात नवीन लोहमार्ग, दुहेरीकरण, विद्युतीकरणाच्या प्रतीक्षेत वर्षानुवर्षे निघून गेली. अखेर छत्रपती संभाजीनगर अंकाई (मनमाड) या ९८ किमी मार्गाचे रेल्वेच्या दुहेरीकरणाचे काम मार्गी लागले. आता छत्रपती संभाजीनगर ते परभणीच्या दुहेरीकरणाचा मार्ग मोकळा झाल्याने मराठवाड्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. हे दुहेरीकरण अनेक वर्षे रखडले होते. त्यामुळे हा रेल्वे प्रवास कायम लांब वाटत होता.

या दुहेरी मार्गामुळे प्रवाशांचा एक ते दीड तास वाचणार आहे. तसेच उद्योग वाढीस चालना मिळणार आहे. जालना येथील ड्रायपोर्टमुळेही रोजगाराला वाव मिळणार आहे. आंदोलने झाली. खा. डॉ. अजित गोपछडे यांनी परेल्वे मंत्र्यांकडे याबाबते पाठपुरावा केला.

रेल्वे दुहेरीकरणाचा असा होणार लाभ

मराठवाड्यात मुळातच रेल्वेचे पुरेसे जाळे नाही. त्यातही बहुतांश मार्ग एकेरी आहेत. त्यामुळे रेल्वेची संख्याही कमी आहे. आता छत्रपती संभाजीनगर ते परभणी दुहेरीकरणामुळे रेल्वेची संख्या वाढणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मनमाड ते परभणी असे विद्युतीकरण झाले, त्यानंतर आता होणारी ही डबल लाईन विकासाचे पर्व ठरणार आहे.

हेही वाचा :

अमेरिकेचा भारताला आणखी एक मोठा झटका… 
इचलकरंजी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद यशस्वी
सरकारी शाळेत शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! 7 हजार 466 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज?