मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी देवीची पूजा करणे फायदेशीर मानले जाते.(aphrodite) या दिवशी लवंगाचे काही उपाय केल्याने सर्व आर्थिक संकटे दूर होतात असे देखील मानले जाते. जाणून घ्या मासिक दुर्गाष्टमीला कोणते उपाय करायचे

पंचांगानुसार, आषाढ गुप्त नवरात्रीची अष्टमी तिथी आज गुरुवार, 3 जुलै रोजी आहे.(aphrodite) तर नवमी तिथी शुक्रवार, 4 जुलै रोजी आहे. यावेळी देवीची पूजा केली जाते. अनेकजण अष्टमी आणि नवमीच्या वेळी कन्या पूजन देखील करतात. मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी लवंगाचे काही उपाय करणे देखील फायदेशीर मानले जाते. जाणून घ्या मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी कोणते उपाय करायचे.
मासिक दुर्गाष्टमी शुभ मुहूर्त
पंचांगानुसार, यंदा आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील(aphrodite) अष्टमी तिथी म्हणजे मासिक दुर्गाष्टमीची तिथी 2 जुलै रोजी 10 वाजता सुरु होणार आहे आणि या तिथीची समाप्ती 3 जुलै रोजी रात्री 11.30 वाजता होणार आहे. उद्यतिथीनुसार मासिक दुर्गाष्टमी 3 जुलै रोजी आहे.
दुर्गाष्टमीच्या दिवशी करा हे उपाय
लवंगाचे उपाय
देवीला प्रसन्न करुन तिचे कायम आपल्यावर आशीर्वाद राहण्यासाठी लवंगाचे हे उपाय करणे खूप फायदेशीर ठरते. या दिवशी लवंगाचे विविध प्रकारांनी उपाय केल्याने तुमच्या जीवनातील आर्थिक संकट, समस्या दूर होण्यास मदत होते.
आर्थिक समस्या होतील दूर
देवीची पूजा करताना लवंगाची जोडी अर्पण करा. लवंगाच्या देठाला जोडलेला कळीसारखा भाग बनला जाईल अशा प्रकारे एक फूल तयार करा. असे मानले जाते की, देवीला हा उपाय खूप प्रिय मानला जातो. तसेच व्यक्तीच्या जीवनात येणारे अडथळे देखील दूर होतात.
आर्थिक समृद्धी
पूजा करुन झाल्यानंतर देवीला अर्पण केलेल्या लवंगा उचलून आपल्या तिजोरीमध्ये किंवा पर्समध्ये ठेवा. या उपायमामुळे घरामध्ये आर्थिकसमृद्धीसोबत आर्थिक स्थिरता देखील येते.
पैशांची कमतरता दूर होणे
जर तुम्हाला दीर्घकाळापासून पैशांची कमतरता जाणवत असेल, उत्पन्नामध्ये येणारे किंवा खर्चावर नियंत्रण न राहणे यांसारख्या समस्या उद्भवत असल्यास लवंगाचे हे उपाय करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतात. लवंगाच्या या उपायाने घरामध्ये सकारात्मकता देखील राहते. घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते.
मासिक दुर्गाष्टमीचे महत्त्व
दुर्गाष्टमीला देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. या दिवशी भक्त भीती आणि अडथळे यामधून मुक्त होतो असे म्हटले जाते. देवीला शक्तीचे प्रतीक मानले जाते. देवीची पूजा केल्याने शत्रूंवर विजय मिळवून जीवनातील सर्व संकटे दूर होतात, असे मानले जाते. तसेच शारीरिक त्रास आणि आजारांपासून देखील सुटका होते. त्याचसोबत भक्ताच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, असे म्हटले जाते.
हेही वाचा :
एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी घेतला सर्वात मोठा निर्णय!
‘आवाज मराठीचा’: 19 वर्षांनंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; राज्याचं लक्ष ५ जुलैच्या ऐतिहासिक सभेकडे
‘बाहेर पडू नका…’ टीम इंडिया राहत असलेल्या हॉटेलबाहेर संशयास्पद वस्तू सापडल्याने खळबळ