उपवासाच्या दिवशी शरीरातील ऊर्जा कायम टिकून राहण्यासाठी घरी बनवा अक्रोड खजूर शेक, राहाल फ्रेश

उपवासाच्या दिवशी नेहमीच साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा (shake)आल्यानंतर सोप्या पद्धतीमध्ये घरी अक्रोड खजूर शेक बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागते. याशिवाय शेक प्यायल्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते.

श्रावण महिन्याला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी किंवा शनिवारी उपवास केला जातो. तसेच भगवान शंकराची मनोभावे पूजा(shake)केली जाते. इच्छित फळ प्राप्त होण्यासाठी काही महिला निर्जळी उपवास करतात. मात्र या उपवासामुळे शरीरात थकवा किंवा अशक्तपणा जाण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी काहींना काही खावे. उपवासाच्या दिवशी प्रत्येक घरात आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे साबुदाणा. साबुदाण्यांपासून खिचडी किंवा खीर बनवली जाते.मात्र नेहमीच साबुदाणे खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही काहींना काही नवीन पदार्थ बनवून शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अक्रोड खजूर शेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा शेक प्यायल्यामुळे शरीरात ऊर्जा कायम टिकून राहते आणि शरीराला अनेक फायदे होतात.

नेहमीच भाजी काय बनवावी सुचत नाही? मग झटपट बनवा (shake)डाळिंब्यांची उसळ, श्रावणातील पारंपरिक रेसिपी

साहित्य:
अक्रोड
खजूर
कस्टर्ड पावडर
साखर
दूध
स्ट्रॉबेरीचे तुकडे
व्हॅनिला आईस्क्रीम
मक्याच्या दाण्यांचा वापर करून नाश्त्यासाठी झटपट बनवा ‘कॉर्न-रवा बॉल्स’, नोट करून घ्या रेसिपी

कृती:
अक्रोड खजूर शेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये दूध उकळण्यासाठी ठेवा. दुधाला उकळी आल्यानंतर त्यात कस्टर्ड पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करा.
कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर सतत चमच्याने मिक्स करत राहा. यामुळे दुधात गुठळ्या होणार नाहीत.
त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात बिया काढून भिजत ठेवलेले खजूर, अक्रोड आणि आवडीनुसार साखर टाकून बारीक पेस्ट तयार करा.
दुधाच्या मिश्रणात तयार केलेली खजूर पेस्ट टाकून व्यवस्थित मिक्स करा आणि फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.
काचेच्या ग्लासात सगळ्यात आधी तयार केलेला शेक ओतून वरून स्ट्रॉबेरीचे तुकडे आणि व्हॅनिला आईस्क्रीम घालून वरून अक्रोडाचे बारीक तुकडे टाका.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले अक्रोड खजूर शेक. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

हेही वाचा :

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये का वाढतो पायांच्या गँगरीनचा धोका? जाणून घ्या लक्षणे आणि पाय स्वच्छ ठेवण्यासाठी उपायआजपासून श्रावणाची जबरदस्त सुरूवात, राशी ठरणार भाग्यशाली! भोलेनाथाचा आशीर्वाद, आजचे राशीभविष्य वाचा
भारताच्या पोरी इतिहास रचणार! FIDE बुद्धिबळ वर्ल्ड कप फायनलमध्ये कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख आमने-सामने, विजेत्याला मिळणार इतके