उन्हाळा ऋतू सुरु झाला आहे. या ऋतूत बाजारात विक्रीसाठी आंबे मोठ्या प्रमाणात येतात. आंबा हा कुणाला खायला आवडत नाही. आंब्याला फळांचा राजा असेही संबोधले जाते. तर या फळांच्या राजापासून आपण अनेक चविष्ट आणि निरनिराळे पदार्थ तयार करू शकतो. जसे की, आमरस, आम्रखंड. कच्चा आंबा म्हणजेच कैरीपासून चटकेदार असा मुरंबा तयार केला जातो मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही पिकलेल्या आंब्यापासून टेस्टी अशी चटणी(chutney) तयार करू शकता.

अनेकांना हे ठाऊक नाही पण पिकलेल्या आंब्यापासून देखील आंबट-गोड अशी चटणी(chutney) तयार केली जाऊ शकते. ही चटणी तुम्ही जेवणावेळी तोंडी लावलायला ठेवून याचा आस्वाद घेऊ शकता. आंबा प्रेमी असाल तर ही चटणी एकदा नक्की ट्राय करा. याची चव तुम्हाला ही चटणी पुन्हा पुन्हा बनवण्यास भाग पाडेल. विशेष म्हणजे यासाठी फार साहित्य आणि वेळेची गरज भासत नाही. अगदी झटपट ही चटणी बनून तयार होते. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
साहित्य
- २ पिकलेले पण घट्ट आंबे (सोलून बारीक चिरलेले)
- १/२ कप साखर किंवा चवीनुसार
- १/४ कप व्हिनेगर (पांढरा किंवा सफरचंद ॲपल)
- १/४ टीस्पून लाल तिखट किंवा चवीनुसार
- १/४ टीस्पून किसलेले आले
- एक चिमूटभर मीठ
- काही मनुके किंवा चिरलेले काजू
कृती
- यासाठी सर्वप्रथम, एका सॉसपॅनमध्ये, चिरलेले आंबे, साखर, व्हिनेगर, लाल तिखट, आले आणि मीठ एकत्र करा
- आता हे मिश्रण मध्यम आचेवर उकळवा आणि मध्ये मध्ये ढवळत राहा
- फ्लेम कमी करा आणि १५-२० मिनिटे किंवा आंबे मऊ होईपर्यंत आणि चटणी इच्छित जाडीची होईपर्यंत उकळवा
- चटणी पॅनला ते चिकटू नये म्हणून अधूनमधून तिला ढवळत राहा
- गॅस बंद करण्यापूर्वी काही मिनिटे आधी मनुके किंवा चिरलेले काजू घाला आणि चटणीत चांगले मिसळून घ्या
- आता गॅस बंद करा आणि चटणी थंड होऊ द्या
- थंड झाल्यावर चटणी आणखी घट्ट होईल
- आता ही तयार चटणी एका हवाबंद डब्यात भरा आणि फ्रीजमध्ये ठेवा
- तुम्ही या चटणीला अनेक आठवडे साठवून ठेवू शकता
हेही वाचा :
‘तारक मेहता’मधील अभिनेत्याची गळफास घेऊन आत्महत्या
IPL 2025 मॅच फिक्सिंग प्रकरणात मोठा ट्विस्ट, राजस्थान रॉयल्सला BCCI चा फुल सपोर्ट