शरीरात थकवा होईल कायमचा दूर! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा गुळाचे थंडगार सरबत

कडक उन्हाळ्यात शरीराला थंडाव्याची आवश्यकता असते. शरीरात उष्णता वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. अशावेळी आहारात ताक, नारळ पाणी, सरबत, कोकम सरबत(Syrup) इत्यादी पेयांचे नियमित सेवन करावे. उन्हाळ्यात आरोग्यासाठी सगळ्यात प्रभावी ठरणारा पदार्थ म्हणजे गूळ. गूळ खाल्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात.

गोड पदार्थ बनवताना गुळाचा वापर केला जातो. मधुमेह किंवा आरोग्यासंबंधित समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात साखरेचे सेवन न करता गुळाचे सेवन करावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गुळाचे थंडगार सरबत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले थंडगार सरबत आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरेल. जाणून घ्या गुळाचे सरबत(Syrup) बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य:

  • गूळ
  • जिऱ्याची पावडर
  • बडीशेप
  • मीठ
  • काळीमिरी पावडर
  • पुदिना
  • लिंबाचा रस
  • पाणी
  • सब्जा

कृती:

  • गुळाचे थंडगार सरबत बनवण्यासाठी सर्वप्रथम, गूळ किसून घ्या. गूळ किसताना किसणीला पाणी लावू नये.
  • मिक्सरच्या भांड्यात गूळ, जिऱ्याची पावडर, बडीशेप, चवीनुसार मीठ, काळीमिरी पावडर, लिंबाचा रस व पुदिन्याची पाने टाकून बारीक वाटून घ्या.
  • त्यानंतर त्यात पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्या.
  • गुळाची तयार करून घेतलेली पेस्ट काचेच्या भांड्यात भरून ठेवा. बंद डब्याच्या झाकणात ठेवलेला पदार्थ अधिककाळ चांगले टिकून राहतात.
  • काचेच्या ग्लासात भिजवलेला सब्जा टाऊन त्यात गुळाची पेस्ट टाका. त्यानंतर त्यात थंड पाणी किंवा बर्फाचे खडे टाकून मिक्स करा.
  • आवश्यकता वाटल्यास तुम्ही त्यात थंड पाणी टाकू शकता. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले गुळाचे थंडगार सरबत.

हेही वाचा :

भारतात लवकरच लाँच होणार Vivo X200 FE!

अखेर प्राजक्ता बोलली! अफेअरच्या चर्चांवर केला मोठा खुलासा

पत्नीला रील्स बनवण्याचा नाद, पुरुषांच्या कमेंट्सचा पतीला राग, दारुच्या नशेत लाथ घातली, अन्….