उत्तराखंडच्या देहरादून शहरात एक धक्कादायक अपघात घडला आहे, ज्यामध्ये शाळेतून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या (Students) गटाला एका भरधाव कारने जोरदार धडक दिली. या अपघाताचा थरकापजनक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांचा(Students) गट रस्त्यावरून जात असताना, एक वाहन अत्यंत वेगात येऊन थेट त्यांच्यावर आदळते. या अचानक झालेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, अनेक विद्यार्थी घाबरलेल्या अवस्थेत दिसले. नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतीसाठी पुढाकार घेतला.
हा संपूर्ण प्रकार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे, देशभरात वाढत्या ट्रॅफिक आणि वेगाने वाहन चालवणाऱ्यांमुळे अशा अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शाळेच्या वेळात मुलांच्या सुरक्षेसाठी कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने पालकांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
School children were crushed by a speeding car in Dehradun. The incident took place on Wednesday afternoon when school children were returning home after school in Selaqui. The speeding car crushed the children. Eight Students are injured
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 24, 2025
pic.twitter.com/SxoRfzKywH
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर @gharkekalesh या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर अपलोड करण्यात आला असून, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरही मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. या व्हिडिओवर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे आणि अपघातास जबाबदार चालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
टीप:
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेची स्वतंत्र पडताळणी करण्यात आलेली नाही. वाचकांसाठी ही माहिती फक्त जनहितार्थ दिली जात आहे.
हेही वाचा :
भारतात लवकरच लाँच होणार Vivo X200 FE!
अखेर प्राजक्ता बोलली! अफेअरच्या चर्चांवर केला मोठा खुलासा
शरीरात थकवा होईल कायमचा दूर! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा गुळाचे थंडगार सरबत